सियाचिन: 18 हजार फूट उंचावर हिमस्खलन; भारतीय सैन्याचे 8 जवान बर्फाखाली अडकले
Avalanche | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

सियाचिन (Siachin) येथे तब्बल 18 हजार फूट उंचावर हिमस्खलन (Avalanche) झाल्याने भारतीय लष्कराचे तब्बल 8 जवान बर्फाखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वृत्तसंस्था एएनआयने केलेल्या ट्विटमध्ये हे 8 जवान कर्तव्यावर असताना ही घटना घडल्याचे म्हटले आहे. सियाचिन येथील ग्लेशियर (Glacier) येथे ही दुर्घटना घडली. दुर्घटना घडली तेव्हा हे आठही जवान या परिसरात गस्त घालत होते. अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, सुरक्षा दल जवान (Security Forces) यांना मदत आणि बचावकार्यासाठी एक मोहिम राबविली जात आहे.

लष्करी अधिकाऱ्याच्या हव्याल्याने प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, ज्या परिसरात ही घटना घडली तो परिसर जमीनीपासून सुमारे 18,000 फूट उंचीवर आहे. (हेहीक वाचा, खुशखबर! भारतीय लष्करात धार्मिक शिक्षकांची नोकरभरती; जाणून घ्या पदे, महत्वाच्या तारखा व इतर माहिती)

एएनआय न्यूज

हिमस्खलन (Avalanche) उत्तर ग्लेशियर (Northern Glacier) परिसरात सोमवारी दुपारी साडेतीन वाजता झाला. हा परिसर जमीनीपासून 18,000 फूटांपेक्षाही अधिक उंचीवर आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्कराचे जवान या हिमस्कलनामुळे गंभीर जखमी झाले आहेत. ते गस्त पथकाचे (Patrolling Party) सदस्य होते. या पथकात सूमारे 8 जवान होते. हे सर्व उत्तर ग्लेशियार परिसरात गस्त घालत असताना ही घटना घडली.