
Pahalgam Attack: जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack) निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पाऊले उचलली आहेत. अशातंच आता भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ (Pakistan Prime Minister Shehbaz Sharif) यांचे अधिकृत यूट्यूब चॅनेल भारतात ब्लॉक (YouTube Channel Blocked in India) केले आहे. वापरकर्ते जेव्हा चॅनेलवर जातात, तेव्हा त्यांना येथे 'राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित सरकारच्या आदेशामुळे ही सामग्री सध्या या देशात उपलब्ध नाही,' असा संदेश पाहायला मिळत आहे.
भारतात 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी -
दरम्यान, यापूर्वी भारत सरकारने 16 हाय-प्रोफाइल पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर (डॉन, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, जिओ न्यूज आणि बोल न्यूज सारख्या अनेक मोठ्या न्यूज मीडिया आउटलेटसह) बंदी घातली होती. गृह मंत्रालयाच्या शिफारशींमुळे कारवाईला चालना मिळाली, त्यात इर्शाद भट्टी, अस्मा शिराजी, उमर चीमा आणि मुनीब फारूख यांसारख्या वैयक्तिक पत्रकारांना लक्ष्य केले गेले. (Pahalgam Terror Attack: भारताने पाकिस्तानचे पाणी केले बंद; Indus Waters Treaty स्थगित झाल्यानंतर सियालकोटजवळ चिनाब नदीचा प्रवाह झाला कमी, पहा उपग्रह प्रतिमा)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्याला जबाबदार असलेल्यांविरुद्ध कठोर सूड उगवण्याचे आश्वासन दिले आहे. भारताने अनेक पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत, त्यानंतर राजदूतांसह 500 हून अधिक पाकिस्तानी नागरिकांनी अटारी-वाघा सीमेचा वापर करून भारत सोडला आहे. (नक्की वाचा: Terrorist Attack in Pahalgam: हल्लेखोरांनी पीएम मोदींची निंदा केली, वडिलांना इस्लामिक श्लोक म्हणायला लावले; पुण्याच्या जखमी संतोष जगदाळे यांंची लेक आसावरी जगदाळे ने सांगितला थरारक प्रसंग. )
तथापि, भारतीय लष्कराने जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी प्रयत्न वाढवले आहेत. तसेच दहशतवाद्यांच्या संबंधित असणाऱ्यांची घरे उद्धवस्त केली आहेत. याशिवाय, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनाही अटक केली आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.