एका अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली कारण त्याचा पालकांनी त्याला घरात कुत्रा पाळण्यासाठी नकार दिला. ही घटना आँध्र प्रदेशातील तटवर्ती शहर विशाखापट्टणम मध्ये सोमवारी घडली आहे. शहरातील वेंकटेश्वरा मेट्टा परिसरातील 16 वर्षीय मुलाने षणमुख वामसीने सीलिंग फॅनला लटकून आत्महत्या केली आहे. खरंतर या मुलाला 30 हजार रुपयांचा कुत्रा खरेदी करायचा होता. पण घरातल्यांनी त्यासाठी नकार दिला. मुलाने कुत्रा ऑनलाईन विक्री करण्यात येणाऱ्या एका वेबसाइटवर पाहिला होता.(Uttar Pradesh: बलात्कारास विरोध, प्रियकराकडून प्रेयसीची हत्या; उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ येथील घटना)
खासगी कॉलेजात शिकणाऱ्या षणमुख वामसी याच्या आईने घरी कुत्रा पाळण्यास नकार दिला. त्यावेळी वामसी याने म्हटले की, काही काळ थांब आणि नंतर कुत्रा खरेदी कर. मात्र घरातल्यांनी असे बोलल्यावर षणमुख हा निराश झाला. त्यानंतर आज त्याची आई सामान खरेदी करण्यास गेली तेव्हा घरी कोणीच नव्हते. आधीच निराश झालेल्या षणमुख याने त्याचवेळी आत्महत्या करण्याचा विचार केला.(वडिलांचा पोटच्या 19 वर्षीय अविवाहित मुलीवर अनेकदा बलात्कार; पिडीतेने दिला मुलाला जन्म, Gujarat मध्ये वडील-मुलीच्या नात्याला काळीमा)
घरात कोणीही नसल्याचे पाहता षणमुख याने गळ्याला फास लावून आत्महत्या केली. आई जेव्हा घरी आली तेव्हा तिने जे दृष्य पाहिले तेव्हा तिला धक्का बसला. षणमुख याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले पण तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी एमआर पेट्टा थाने पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.