Representational Image (Photo credits: Pixabay)

महिलांच्या सुरक्षेसाठी (Women's Safety) सुरु करण्यात आलेल्या दिशा अॅपच्या (Disha App) साहाय्याने आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) मधील विजयवाडा पोलिसांनी (Vijayawada Police) आरोपीला अटक केली आहे. पीडित महिलेने अॅपमधील SOS बटण दाबल्यानंतर अवघ्या 6 मिनिटांत आरोपीला अटक करण्यात यश आल्याचे विजयावाडा पोलिस आयुक्त B. Sreenivasulu यांनी IANS शी बोलताना सांगितले. आकाश (Akash) असे या आरोपीचे नाव आहे. (Thane: छेडछाडीला विरोध केला म्हणून एका महिलेसह तिघांना मारहाण, 11 जणांना अटक)

ही घटना शहरातील सत्यनारायणापूर या भागातील एका रेल्वे क्लबजवळ घडली. पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघे वर्गमित्र असून आरोपीकडून मुलीला वारंवार त्रास सहन करावा लागत होता. यापूर्वी देखील पीडितेने आरोपीची तक्रार आपल्या वडीलांकडे आणि महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे केली होती. मात्र वारंवार ताकीद देऊनही आकाशच्या वागण्यात कोणताही बदल दिसून आला नाही. शुक्रवारी परीक्षा देऊन परत येत असताना आकाशने मुलीचा पाठलाग सुरु ठेवला. आकाशच्या या वागणुकीला वैतागून तिने दिशा अॅपमधील SOS बटण दाबले आणि दिशा कॉल सेंटरद्वारे पोलिसांना याची खबर पोहचली. अवघ्या 6 मिनिटांत आम्ही घटनास्थळी पोहचून आकाशला ताब्यात घेतले आणि त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती Mary Prasanthi यांनी दिली आहे.

आंध्रप्रदेश पोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12.31 मिनिटांनी पीडितेने अॅपमधील बटण दाबले आणि 12.37 मिनिटांनी पोलिसांनी आकाशला ताब्यात घेतले. आयपीसी कलम 354(ड) आणि 506 अंतर्गत आकाशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आकाशला कोर्टासमोर सादर केलेले नाही.