Thane: छेडछाडीला विरोध केला म्हणून एका महिलेसह तिघांना मारहाण, 11 जणांना अटक
Arrested (Photo Credits: Facebook)

छेडछाडीला विरोध केला म्हणून एका महिलेसह तिच्या अन्य मित्रांवर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ठाणे (Thane) जिल्ह्याच्या कोसळेवाडी (Kolsewadi) परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी 11 जणांना अटक केली करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. संबंधित महिला रस्त्यावरून जात असताना एका रिक्षाचालकाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. तिच्या मित्रांनी त्यांना विरोध केला. यामुळे रिक्षा चालकाच्या सांगण्यावरून स्थानिक लोकांनी या महिलेसह तिच्या मित्रांना मारहाण केली आहे.

पोलिसांत नोंदवलेल्या तक्रीरीनुसार, संबंधित महिला एकटी असल्याचा फायदा घेत एका रिक्षाचालकाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे महिला जोरजोरात ओरडली आणि आपल्या 2 मित्रांना बोलावून घेतले. उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या या महिलेचे मित्र घटनास्थळी पोहचताच रिक्षाचालकाने काही स्थानिक ग्रामस्थांना बोलावून घेतले. त्यांनी या दोघांना जबर मारहाण केली. सोडून देण्याची विनंती करत असतानाही या तिघांना पट्ट्याने मारहाण करत होते. हे देखील वाचा- Maharashtra Police: पोलीस शिपाई होणार PSI, गृहविभागाचा प्रस्ताव; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच इतरांचा शोध सुरू आहे. या मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक या घटनेबाबत संतप्त झाले आहेत. कोलसेवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांनी सांगितले की, हल्लेखोरांसह ऑटोरिक्षा चालकासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.