Foreign Minister S Jaishankar | (Photo Credits: Twitter)

राज्याचे उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत जयशंकर यांच्या ‘द इंडिया वे’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद असलेल्या ‘भारत मार्ग’चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शेजारी देश पाकिस्तानसह चीन बाबत एस जयशंकर यांची महत्वपूर्ण टिपण्णी केली. एस जयशंकर म्हणाले आयुष्यात काही वस्तु अशा असतात ज्या कायमच्या असतात त्या तुम्ही बदलू शकत नाही. ज्याप्रमाणे पाडव त्याचे नातेवाईक बदलू किंवा निवडू शकले नाहीत त्याचं प्रमाणे भारत देखील आपले शेजारी निवडू शकला नाही आणि आता हेचं भारताचे कायमचे शेजारी असतील, असं मिश्कील वक्तव्य देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शेजारी देश पाकिस्तान आणि चीन बाबत केलं आहे. त्याचप्रमाणे चीनबाबत बोलताना एस जयशंकर म्हणाले, चीन हा एक असामान्य शेजारी आहे, आपले अनेक शेजारी आहेत पण चीन कदाचित जागतिक महासत्ता बनू शकेल ही शक्यता नाकारता येणार नाही आणि महासत्ता देशाच्या बाजूने राहणं ही खरचं एक चॅलेंजिग बाब आहे.

 

तसेच भारताच्या शेजाऱ्यांबाबत बोलताना एस जयशंकर म्हणाले, भारताला विशेष शेजारी असल्याने इतर देशांच्या तुलनेत भारताला दहशतवादामुळे अधिक त्रास सहन करावा लागला आहे. काही वेळा राष्ट्रीय सुरक्षेसाठी आव्हाने असतात ज्यामुळे देशाला निर्णायक पावले उचलावी लागतात अशी मत एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानसह चीन विरुध्द कायमचं खरमरीत भुमिका घेताना दिसतात. तरी स्वतच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात देखील आंतरराष्ट्रीय घडामोडींबाबत एस जयशंकर दिलखुलास गप्पा मारताना दिसले. (हे ही वाचा:- PM Kisan Samman Nidhi Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता - रिपोर्ट)

 

एस जयशंकर म्हणाले, जर तुम्ही परदेशी वर्तमानपत्रे वाचली तर भारत सरकारसाठी ते हिंदू राष्ट्रवादी सरकार असे शब्द वापरतात. मग अमेरिका किंवा युरोपसाठी ही वर्तमानपत्रे ख्रिश्चन राष्ट्रवादी असा शब्दप्रयोग का करीत   नाहीत. हिंदू राष्ट्रवादी सरकार ही विशेषणे जणू काही मोदी सरकारसाठी राखीव आहेत, त्याप्रमाणे परदेशातील वर्तमान पत्रात बातम्या छापून येतात. पण भारत हिंदूराष्ट्र आहे वा मुस्लिम विरोधी अशा प्रकारचे उल्लेख करण्यापेक्षा भारत जगातील इतर कुठल्याही देशापेक्षा कमी नाही. तसेच जगासाठी खुप काही करण्याचं सामर्थ्य भारतात आहे असं वक्तव्य देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलं आहे.