Awantipora Encounter | (Photo Credits: ANI)

जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) मधील अवंतीपोरा (Awantipora) येथे सुरक्षारक्षक आणि दहशतवादी यांच्यात सुरु असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सध्या ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. चकमक सुरु असलेल्या ठिकाणी अजून काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, अवंतीपोरा येथील शरशाली खुरे (Sharshali Khrew) येथे काल रात्री सुरक्षारक्षक आणि दहशतवादी यांच्या गोळीबार झाला. यात एक दहशतवादी ठार झाला. त्यानंतर चकमक सातत्याने सुरु होती.

गुप्त सूचनेच्या आधारावर सुरक्षारक्षकांनी हल्ला करत सुमारे 3 दहशतवाद्यांना घेरले. यात दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीन कमांडर रियाज नाइकू लपला असण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर त्याला पकडण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. (Pulwama Encounter: हिजबुल मुजाहिद्दीन कमाडंर Riyaz Naikoo पुलवामा येथे भारतीय लष्कराच्या सापळ्यात)

ANI Tweet:

मंगळवारी (5 मे) जम्मू-काश्मीर मधील बडगाम येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय रिजर्व पोलिस बल च्या जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. यात दोन नागरिक जखमी झाले. तर सोमवारी (4 मे) काश्मीरच्या कुपवाडा येथे दहशतवाद्यांच्या गोळीबारात CRPF चे 3 जवान शहीद झाले. तर 2 जखमी झाले. याच्या एक दिवसापूर्वी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत  CRPF चे 5 जवान शहीद झाले होते. यात एक कर्नल आणि मेजर यांचाही समावेश होता.