Ambedkar Jayanti 2020: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिवंतपणी काँग्रेसने मान दिला नाही; भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप
JP Nadda (Photo Credits: IANS)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr, Babasaheb Ambedkar) यांची आज, 129 वी  जयंती आहे. यानिमित्त आज सकाळपासूनच अनेक राजकारणी मंडळी ट्विटर व अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सहित अनेक दिग्गज नेत्यांनी सुद्धा आंबेडकरांना अभिवादन करणारे ट्विट केले आहे. मात्र या सर्व वातावरणात भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P. Nadda) यांनी केलेले एक विधान मात्र काही वेळापासून चांगलेच चर्चेत आले आहे. नड्डा यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाचतानाच विरोधी पक्ष काँग्रेसवर (Congress) हल्लाबोल केला आहे. "बाबासाहेबांच्या हयातीत काँग्रेसने कधीच त्यांना मानाने वागवले नाही, आंबेडकरांना भारतरत्न (Bharatratna) सुद्धा त्यांच्या मृत्यूपश्चात 4 दशकांनी देण्यात आला होता. मात्र दुसरीकडे भाजपने  (BJP) नेहमीच बाबासाहेबांचे विचार हे सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे" असे नड्डा यांनी म्हंटले आहे. Ambedkar Jayanti 2020 Wishes: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठामोळे Messages, Wishes, Greetings शेअर करून साजरी करा यंदा भीम जयंती!

जे. पी. नड्डा यांनी पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या उल्लेख करत, बाबासाहेबांनी समाज, अर्थव्यवस्था आणि संविधानाची निर्मिती करण्यात दिलेले योगदान ही फार मोठे आहे, त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही भाजपचे कार्यकर्ते सुद्धा राजकीय, सामाजिक आर्थिक बाबतीत देशात काम करत आहोत. असेही म्हंटले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी देशभरात मोठ्या उत्साहात पार पडते, यानिमित्ताने मुंबईतील चैत्यभूमीवर दर्शनासाठी आंबेडकरी अनुयायी लांबुन सुद्धा येतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन जारी असताना सर्वांनी घरीच भीम जयंती साजरी करावी असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे. तसेच आंबेडकरांचा जयंती दिवस हा ज्ञान दिन म्हणून देखील साजरा होतो त्यामुळे यादिवशी प्रत्येकाने पुस्तक वाचून आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करावे असे महाराष्ट्र मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.