राज्यातील कोरोना व्हायरसचे संकट पाहता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Birth Anniversary) त्यांच्या पुस्तकांचे वाचन करुन 14 एप्रिल हा दिवस 'वाचन दिन' म्हणून घरातच साजरा करावा, असं आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं आहे. बाबासाहेबांनी कोट्यवधी लोकांना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. तसेच बौद्ध धम्माची दीक्षा दिली. महात्मा फुले यांचा जन्मदिन ज्ञानाचा दिवा लावून घरातच साजरा झाला. त्याप्रमाणेच आता बाबासाहेबांची पुस्तके वाचून त्यांची जयंती घरीच साजरी करा, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिला आहे. कोरोनाच्या संकटामुळे महामानव डॉ. बाबासाहेबांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करा, असं आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केलं आहे. डॉ. बाबासाहेब हे द्रष्टे विचारवंत, कृतिशील नेते होते. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रउभारणीत दिलेलं योगदान अजरामर आहे. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना त्यांनी आत्मसन्मान व समानतेची संधी मिळवून दिली. डॉ. बाबासाहेब हे त्यांच्या विचारांनी, कार्याने महामानव ठरले. एकता, समता, बंधुतासारखे त्यांचे मानवतावादी, उदारमतवादी, सुधारणावादी विचार आपल्या सर्वांना पुढे नेतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. (हेही वाचा - Coronavirus Lockdown: लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील आंबा व्यवसायाला मोठा फटका)
बाबासाहेबांनी कोट्यवधी लोकांना अज्ञानाच्या अंधारातून काढले बाहेर.त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. बौद्ध धम्माची दीक्षा दिली. महात्मा फुले यांचा जन्मदिन ज्ञानाचा दिवा लावून घरातच झाला साजरा.त्याप्रमाणे बाबासाहेबांची पुस्तके वाचून त्यांची जयंती घरीच साजरी करुया-मंत्री @ChhaganCBhujbal
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 13, 2020
भारतीय संविधानाचे शिल्पकार, #भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा. #coronavirus च्या संकटामुळे महामानव डॉ. बाबासाहेबांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करण्याचे आवाहन. pic.twitter.com/ekiBUDTOey
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 13, 2020
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण घरात थांबूनचं बाबासाहेबांची जयंती साजरी करुया. त्यांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर आणि कोरोना विरुद्धच्या लढाईतील एकजूट दाखवून देऊया, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.