Alleged Congress' COVID-19 Toolkit: टूलकिट प्रकरणी काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आहे. याच दरम्यान, ट्विटरवर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी एक ट्विट Manipulated Media असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच त्यांच्याकडून करण्यात आलेला दावा तथ्यात्मक रुपात योग्य नाही आहे. ट्विटरच्या या अॅक्शन नंतर काँग्रेस कडून भाजपवर अधिक हल्लाबोल करण्यात आला. आता टूलकिट प्रकरणी संचार मंत्रालयाने ट्विटवर वर या संबंधित आक्षेप व्यक्त केलाआहे. त्याचोबत असे म्हटले आहे की, या तपासात पडून नये.(Unemployment Rate: कोरोना संकट काळात ग्रामीण बेरोजगारीचा दर 14.34 टक्क्यांवर; लॉकडाऊनमध्ये 75 लाखाहून अधिकांनी गमावल्या नोकऱ्या)
केंद्र सरकारने कोरोना संबंधित प्रयत्नांना बदनाम करण्यासाठी संबति पात्रा यांनी काँग्रेस द्वारे 'टूलकिट' चा आधार घेतल्याचा दावा केला. मात्र ट्विटरने संबितचे हे ट्विट मॅन्युप्युलेटेड असल्याचे म्हटले. सुत्रांनुसार सरकारने ट्विटरने ट्विटरला मॅन्युप्युलेट मीडिया टॅग हवण्यासाठी सांगितले. कारण हे प्रकरण कायदा अंमलबजावणी एजंन्सीकडे आहे. कंन्टेंटच्या सत्यतेचा तपास ना एजेंन्सी करणार ना ट्विटर. यासाठी ट्विटटवरला तपास प्रक्रियेत दखल न देण्यास सांगण्यात आले आहे.
सरकारकडून असे सांगण्यात आले आहे की, ट्विटर आपला निर्णय देऊ शकत नाही. कारण अद्याप तपास सुरु आहे. ट्विटरकडून या पद्धतीचा कंन्टेंटला मॉडरेशन मध्ये टाकणे मध्यस्थी रुपात त्यांच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करतात. मंत्रालयाने ट्विटरला पाठवलेल्या आपल्या मेसेज मध्ये म्हटले आहे की, संबंधित पक्षांमधील एकाने कायदा अंमलबजावणी एजेंन्सी समोर टूलकिटच्या सत्यतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत तक्रार केली आहे. याचा तपास सुरु आहे.(Covid Vaccination FAQs बाबत माहिती मिळवण्यासाठी व्हॉट्सअॅप हेल्पडेस्क नंबर +91 - 9013151515)
सरकराने पुढे असे म्हटले की, जर एजेंन्सी कडून टूलकिट प्रकरणी तपास केला जात आहे. तर ट्विटरकडून या प्रकरणी एकतर्फी निष्कर्ष काढला असून आपल्या परीने त्याला मॅन्युप्युलेटेड मीडिया रुपात टॅग केले आहे. ट्विटरकडून करण्यात आलेल्या अशा प्रकारची टॅगिंग पूर्व-निर्धारित आणि एजेंन्सीकडून तपासाला रंग देण्याचा एक जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे दिसून येते. मंत्रालयाने ट्विटर द्वारे या प्रकारच्या एकतर्फी कार्यवाहीला निष्पक्ष तपास प्रक्रियेला प्रभावित करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, कोरोनाच्या संकटकाळात संबित पात्रा यांनी 18 मे रोजी एक ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी टूलकिटचा हवाला देत काँग्रेसवर आरोप लावला होता. त्यात असे म्हटले की, काँग्रेस कडून सरकारला बदनाम करण्यासाठी टूलकिटचा वापर केला जात आहे. अशातच आता ट्विटरने हे ट्विट मॅन्युप्युलेटेड मीडिया असल्याचे म्हटले असून हा दावा तथ्यात्मक रुपात योग्य नाही असे ही स्पष्ट केले आहे.