बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार (Akshay Kumar) मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या (Narendra Modi) मुलाखतीवरून चर्चेमध्ये होता. लोकसभा निवडणूक 2019(Lok Sabha Elections) च्या मतदानामध्ये ट्विंटल खन्नासोबत अक्षय कुमार मतदान केंद्रावर न दिसल्याने सोशल मीडियामध्ये चर्चेमध्ये होता. आज अक्षय कुमारने त्याच्या नागरिकत्त्वाबद्दल खुलासा करणारं ट्विट केलं आहे. अक्षय कुमार याने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास मुलाखत; पहा Videos
अक्षय कुमारचं ट्विट
— Akshay Kumar (@akshaykumar) May 3, 2019
अक्षय कुमारने केलेल्या ट्विटमध्ये त्याने आपल्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याचं कधीच लपवलं नाही असं म्हटलं आहे. दरम्यान अक्षय कुमारच्या 'भारत प्रेम','नागरिकत्त्व' आणि 'मतदान' याबद्दल सातत्याने नकारात्मक बोलणं हे चूकीचं असल्याचं म्हटलं आहे. मला माझं 'भारत प्रेम' विशेष सिद्ध करण्याची गरज नाही असं म्हटलं आहे.
निवडणुकीच्या काळात अक्षय कुमार भाजपाच्या तिकीटावर निवडणूकीच्या रिंगणात उतरेल अशा चर्चादेखील रंगल्या होत्या. निवडणूकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अराजकीय मुलाखतदेखील घेतली होती.