Akasa Air: आता विमान प्रवास होऊ शकतो आणखीन स्वस्त; Rakesh Jhunjhunwala सुरु करत आहेत 70 विमानांसह नवीन Low Cost Airline
Rakesh Jhunjhunwala (Photo Credits: Instagram)

भारतीय अब्जाधीश आणि शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) लवकरच आपल्या नव्या विमान कंपनीसाठी 70 विमाने खरेदी करणार आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार झुनझुनवाला पुढील चार वर्षांत 70 विमानांसह नवीन विमान कंपनी सुरू करू इच्छित आहेत. झुनझुनवाला यांची इच्छा आहे की भारतामधील जास्तीत जास्त लोकांनी विमानाने प्रवास करावा. यासाठी ते लोकांना परवडेल अशी विमान कंपनी स्थापित करू इच्छित आहेत. येत्या 15 दिवसांत राकेश झुनझुनवाला यांना भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळवायचे आहे.

ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत झुनझुनवाला म्हणाले की, नवीन एअरलाइन्स कंपनीत सुमारे 35 दशलक्ष डॉलर्सची (साधारण 260.7 कोटी) गुंतवणूक करण्याचा विचार आहे. या गुंतवणूकीच्या माध्यमातून विमान कंपनीत 40 टक्के हिस्सा घेण्याची ते योजना अखात आहेत. ते म्हणाले की, येत्या 15 किंवा 20 दिवसांत भारतीय उड्डाण मंत्रालयाकडून एनओसी मिळू शकेल.

अशाप्रकारे झुनझुनवाला हे भारतात कमी किमतीची बजेट विमानसेवा सुरू करण्याची योजना आहे, ज्याचे नाव अकासा एअर (Akasa Air) असेल. या नवीन विमान कंपनीत डेल्टा एअरलाईन्सच्या माजी वरिष्ठ कार्यकारीप्रमाणे संपूर्ण टीम असणार आहे. झुनझुनवाला यांच्या विमानामधून साधारण 180 लोक प्रवास करू शकतील. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार झुनझुनवाला यांची नेटवर्थ 4.6 अब्ज डॉलर (साधारण 34.21 हजार कोटी) इतकी आहे. स्पाइसजेट आणि ग्राऊंड एअरलाइन्स कंपनी जेट एअरवेजमध्ये झुनझुनवाला यांचा 1-1% हिस्सा आहे. (हेही वाचा: Uttar Pradesh Road Accident: उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकची डबल डेकर बसला जोरदार धडक, 18 जणांचा मृत्यू)

कोरोना साथीच्या आजारामुळे एव्हिएशन उद्योगाची स्थिती आधीच भयानक आहे. त्यात आता कोरोनाची तिसरी लाट येण्याचीही शक्यता आहे. दुसरीकडे, साथीच्या आजारामुळे बिघडत चाललेल्या परिस्थितीतही राकेश यांना अशी अपेक्षा आहे की येत्या काही दिवसांत विमानचालन उद्योगात मागणी वाढेल. ते म्हणतात की भारतीय बाजाराची वाढ कायम राहील आणि लवकरच महागाईही नियंत्रणात येईल.