Uttar Pradesh Road Accident: उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकची डबल डेकर बसला जोरदार धडक, 18 जणांचा मृत्यू
Uttar Pradesh Road Accident (Photo Credit: ANI)

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बाराबंकी (Barabanki) येथे बुधवारी मध्यरात्री मोठा अपघात झाला आहे.राम सनेही घाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत लखनऊ-अयोध्या राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव ट्रकने डबल डेकर बसला धडक (Road Accident) दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 19 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची महिती होताच स्थानिक पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना त्वरीत उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती.

बाराबंकी येथील अयोध्या सीमेवरील कल्याणी नदी पुलावरील डबल डेकर बस बुधवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास एक्सल तुटल्याने बंद पडली. मुसळधार पावसामुळे चालक व ऑपरेटर बस बाजूला उभे राहून बस दुरुस्त करीत होते. दरम्यान, भरधाव वेगात लखनौच्या दिशेने जाणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने बसला धडक जोरदार दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बसमधील निम्मे प्रवाशी जागीच ठार झाले. हे देखील वाचा-Uttar Pradesh Shocker: लग्नाला नकार देणाऱ्या वडिलांची हत्या; मुलीसह तिच्या प्रियकराला अटक, उत्तर प्रदेश येथील घटना

ट्वीट-

या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु: ख व्यक्त करत म्हणाले की, मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधला आहे. जखमींवर योग्य उपाचार केले जात आहे. याचबरोबर या घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटंबांना प्रत्येकी दोन-दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजारांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.