Ajit Doval (Photo Credits-PTI)

केंद्र सरकार मध्ये सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने येत्या पाच वर्षांसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (National Security Domain) अजित डोभाल (Ajit Dowal) यांना केबिनेट मंत्रीपदाचा (Cabinet Minister) दर्जा बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच पुन्हा एकदा अजित यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार पदी नियुक्ती देखील करण्यात आली आहे. अजित यांचा अनुभव पाहता त्यांना हे पद देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला विसरणार नाही, दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करणार: अजित डोवाल

ANI ट्विट

डोवाल यांनी मागील सरकारमध्येही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपद सांभाळलं आहे. 2014 मध्ये केंद्र सरकारनं त्यांची या पदावर नियुक्ती केली होती. उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेला सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकवेळी रणनिती आखण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. यासोबतच त्यांनी आयबी संस्थेच्या प्रमुखपदी पाकिस्तानात सहा वर्ष वास्तव्य केले आहे. 1988 मध्ये त्यांना 'किर्ती चक्र' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. 1968 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अजित डोभाल हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले पोलीस अधिकारी आहेत.

अजित डोभाल यांच्या नियुक्ती सोबतच अतिरिक्त प्रमुख सचिव पदासाठी पी के मिश्रा यांचे नाव चर्चेत आहे.