पुलवामा दहशतवादी हल्ला विसरणार नाही, दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करणार: अजित डोवाल
Ajit Doval (Photo Credits-PTI)

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (National Security Advisor) अजित डोवाल (Ajit Doval) यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन (Pulwama Attack) पाकिस्तानला (Pakistan) चेतावणी दिली आहे. तसेच डोवाल यांनी मंगळवारी असे म्हटले आहे की, सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेला हल्ला कधीच विसरणार नसून दहशतवाद्यांवर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

सीआरपीएफच्या 80 व्या वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना अजित डोवाल यांनी असे म्हटले की, देशात झालेला पुलवामा हल्ला विसरलो नसून तो कधीच न विसरण्यासारखा आहे. तर त्यांच्यावर कारवाई करणारच असे म्हटले आहे.(हेही वाचा-Pulwama Terror Attack: दहशतवाद्यांनी केलेल्या चुकीला चोख उत्तर मिळेल; पीएम मोदी यांचा इशारा)

तसेच पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना डोवाल यांनी यावेळी श्रद्धांजली दिली. तसेच सीआरपीएफच्या जवानांचे कौतुक करत त्यांचे देशातील महत्वपूर्ण अधिक असल्याचे म्हटले आहे. अर्धसैनिक बळाला संबोधित करत देशातील व्हीआयपी सिक्युरिटी, दहशतवाद, कठिण क्षेत्रांच्या ठिकाणी सतर्क राहून लक्ष देऊन येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यात सीआरपीएफचे योगदान फार मोठे असल्याचे डोवाल यांनी सांगितले आहे.