Thawar Chand Gehlot (Photo Credits: IANS)

कर्नाटकचे राज्यपाल (Karnataka Governo) थावरचंद गहलोत (Thawar Chand Gehlot) यांना विमानतळावरच सोडून एअर एशियाच्या विमानाने हैदराबादच्या दिशेने आकाशात उड्डाण घेतले. ही घटना गुरुवारी (27 जुलै) दुपारी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 वर घडली. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गेहलोत गुरुवारी दुपारी टर्मिनल-2 वरून हैदराबादला जाणार होते, तेथून ते दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी रायचूरला रस्त्याने जाणार होते.

AirAsia चे फ्लाइट (I5972) मध्ये राज्यपाल गहलोत यांचे सामान भरण्यात आले. मात्र, व्हिआयपी मार्गावरुन राज्यपाल विमानाच्या दिशेने दाखल होत असताना टर्मिनलवर पोहोचण्यास त्यांना काहीसा विलंब झाला. त्यामुळे गहलोत हे विमानाच्या दिशेने निघाले तेवढ्यात विमानाने आकाशात उड्डाण केले. त्यामुळे राज्यपालांना तब्बल 90 मिनीटे प्रतिक्षा करुन दुसऱ्या विमानाने प्रवास करावा लागला.

एअरएशियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “हे फ्लाइट दुपारी 2:05 वाजता बेंगळुरूहून हैदराबादला रवाना होणार होते. राज्यपालांचे आगमन होण्याच्या अवघ्या ४ मिनिटे अगोदर दुपारी २:०१ वाजता झाले. तथापि, सुरक्षा तपासणी आणि इतर प्रोटोकॉल निर्गमन करण्यापूर्वी 15 मिनिटे पूर्ण करणे आवश्यक होते, ज्यामुळे राज्यपालांना फक्त 4 मिनिटे बाकी असताना फ्लाइटमध्ये चढणे कठीण होते.

एअरएशियाच्या सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेनेदिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, हे फ्लाइट दुपारी 2:05 वाजता बेंगळुरूहून हैदराबादला रवाना होणार होते. राज्यपालांचे आगमन होण्याच्या अवघ्या 4 मिनिटे अगोदर दुपारी 2.01वाजता झाले. तथापि, प्रस्थानाच्या 15 मिनिटे आधी सुरक्षा तपासणी आणि इतर प्रोटोकॉल पूर्ण करणे आवश्यक होते, ज्यामुळे राज्यपालांना फक्त 4 मिनिटे बाकी असताना फ्लाइटमध्ये चढणे कठीण होते