Air India Flight (PC - Wikimedia Commons)

एअर इंडियाच्या (Air India) विमानात प्रवासी आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्यामध्ये मोठे भांडण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सिडनी-दिल्ली विमानात (Sydney-New Delhi flight)  हा प्रकार घडला आहे. एका प्रवाशाने विमानात आधी गोंधळ घातला, त्यानंतर विमान कंपनीच्या अधिकाऱ्याशी वाद घातला. याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार आरोपीला संरक्षण यंत्रणांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. एअर इंडियाचे एक वरिष्ठ अधिकारी सिडनीहून दिल्लीला जात होते.  (हेही वाचा - Mumbai News: मार्वे समुद्रात 5 मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, तिघांचा शोध सुरु)

सिडनी-दिल्ली विमानात या प्रवाशाने बिझनेस क्लासचं तिकीट बूक केलं होतं. परंतु काही कारणास्तव त्यांची सीट बदलण्यात आली. त्यांना बिझनेस क्लासमधून इकोनॉमी क्लासमधील सीट देण्यात आली. इकोनॉमी क्लासमध्ये बसल्यानंतर या अधिकाऱ्याने विमानात मोठ्या आवाजात बोलणाऱ्या एका सहप्रवाशाला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो सहप्रवासी वाद घालू लागला. तसेच त्याने या अधिकाऱ्यावर हल्ला केला. त्यावेळी एअर इंडियाचा केबिन क्रू त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होता. प्रवाशाने आधी त्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली, त्यानंतर त्याचा गळा आवळला, तसेच शिवराळ भाषेत अपमान केला.

ही घटना 9 जुलै 2023 ची आहे. एअर इंडियाच्या एआय – 301 या विमानाने सिडनीहून दिल्लीसाठी उड्डाण केलं होतं. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळाने एका प्रवाशाने विमानात गोंधळ सुरू केला. त्यानंतर त्याला तोंडी आणि लेखी इशारे देण्यात आला. तरीही त्याच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. या गोंधळामुळे इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. एअर इंडियाने म्हटलं आहे की, विमान दिल्लीत उतरल्यानंतर त्या प्रवाशाला सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात देण्यात आलं. त्यानंतर प्रवाशाने लेखी माफी मागितली.