Air India | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

भारतामध्ये देशव्यापी लॉकडाऊन सुरू असताना सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने काही भागात मर्यादीत स्वरूपात विमानसेवा सुरू करण्याबाबत आता हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान सध्या 3 मे पर्यंत भारतामध्ये आहे. पुढे लॉकडाऊन बद्दल काय निर्णय होणार? याची लवकरच स्पष्टता दिली जाईल मात्र ANI च्या वृत्तानुसार, मे महिन्याच्या मध्यापर्यंत एअर इंडिया पुन्हा आपल्या सेवा मर्यादीत प्रमाणात सुरू करू शकतात. यासाठी पायलट, केबिन क्रु यांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान अद्याप केंद्र सरकारकडून देशांर्तगत विमान सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत.

न्यूज एजेंन्सी एनआयच्या वृत्तानुसार, एअर इंडियाने त्यांच्या ऑपरेशन स्टाफला मेलच्या माध्यमातून देशांर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी पास मागितले आहेत. दरम्यान भारत सरकारने गल्फ देशांमधील भारतीय आणि पर्यटकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

ANI Tweet 

भारतामध्ये कोव्हिड 19 चा प्रसार रोखण्यासाठी 23 मार्च पासून विमान सेवा खंडीत केली आहे. काही दिवसांपूर्वी एअर इंडियाने त्यांच्या वेबसाईटवर 4 मेपासून देशांर्गत आणि 1 जून पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवांसाठी तिकीट बुकिंग सुरू करत असल्याचं जाहीर केलं होतं पण त्यानंतर गृहमंत्रालयाने अशाप्रकारचे आदेश दिलं नसल्याचं स्पष्टीकरण देत विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय लॉकडाउनवर अवलंबून असेल असे म्हटले आहे.