अहमदाबाद: बायकोला French Kiss करु असे सांगत चाकूने जीभ कापून नवऱ्याने काढला पळ, गुन्हा दाखल
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

गुजरात मधील अहमदाबाद (Ahmedabad)  येथे एका विवाहित 37 वर्षीय महिलेकडे नवऱ्याने फ्रेंच किस (French Kiss)  करण्याची फूस लावली. यामुळे नवऱ्यासोबत झालेल्या भांडणाचा विसरल त्याला पडला असल्याचे बायकोला वाटले. पण किस करण्यासाठी जशी महिलेने जीभ बाहेर काढली त्याच क्षणी नवऱ्याने बायकोच्या जीभेवर चाकू हल्ला करत कापली. एवढेच नाही तर कापलेली जीभ बायकोच्या हातात देऊन नवऱ्याने पळ काढला.

जुहापूरा येथील ही घटना असून तसलीम असे पीडित महिलेचे नाव आहे. या घटनेप्रकरणी तसलीम हिने पोलीस स्थानकात धाव घेत नवऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देत असे म्हटले की, 2008 मध्ये अयूब नावाच्या व्यक्तीसोबत तसलीम हिचे लग्न झाले होते. तसलीम हिचे तीसरे तर अयूब याचे हे दुसरे लग्न होते. तसलीम हिने पोलिसांना म्हटले की, लग्न झाल्यानंतर दोन-तीन महिने आनंदात गेले पण त्यानंतर अयूब लहानसहान गोष्टीवरुन माझ्यासोबत भांडण करत असे. एवढेच नाही तक कामाबाबत अयूब निष्काळजी आणि हलगर्जीपणा करत असे. या गोष्टीबाबत जर अयूब याला विचारले असता तो तसलीम हिला मारहाण करायचा. मात्र लग्न केल्यानंतर ते टिकवण्यासाठी ती नवऱ्याने दिलेल्या शिव्या आणि मारहाण सहन करत होती.(धक्कादायक! मुंबई पोलिसाने रशियन महिलेवर 12 वर्ष बलात्कार केल्याचा आरोप, अनेकदा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा महिलेचा दावा)

मात्र अयूब याने बायकोकडे रात्रीच्या वेळेस झोपले असता लाडात येऊन फ्रेंच किस करु असे म्हटले. यावर तसलीम हिला नवरा सगळी भांडण विसरला असून पुन्हा आधीसारखा वागत असल्याचे तिने मनोमन आनंद व्यक्त केला. पण जेव्हा किस करण्यासाठी तसलीम हिने जीभ बाहेर काढली असता अयूबने अचानक चाकू बाहेर काढून तिची जीभच कापली.पाडित महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून फरार आरोपी अयूब याचा पोलिसांकडून शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.