धक्कादायक! मुंबई पोलिसाने रशियन महिलेवर 12 वर्ष बलात्कार केल्याचा आरोप, अनेकदा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा महिलेचा दावा
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

महिला सुरक्षेसाठी प्रयत्नशील असणाऱ्या मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) नावाला काळिमा फासणारी एक तक्रार नुकतीच चेंबूर पोलीस स्थानकात (Chembur Police Station) दाखल करण्यात आली आहे. यानुसार एका रशियन महिलेवर मुंबई पोलीस अधिकाऱ्याने 12 वर्ष वारंवार बलात्कार (Rape Case) करत तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याची पीडितेचा आरोप आहे. संबंधित अधिकाऱ्याचे नाव अनिल जाधव असे असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी महिलेचे पती असल्याचे समजत आहे. ही महिला बॉलिवूड अभिनेत्री होण्याचे स्वप्न घेऊन 2003 पासून मुंबईत राहत होती, या दरम्यान व्हिजाच्या कामासाठी तिची जाधव यांच्याशी ओळख झाली पण त्यावेळेस महिलेला गुंगीचे औषध देऊन जाधव यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि त्यांनतर धमक्या देत मागील 12 वर्ष हा प्रकार घडत असल्याचे पीडित महिलेने सांगितले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अनिल जाधव यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवणाऱ्या महिलेने बलात्कारा सोबतच अन्य अनेक आरोप लगावले आहेत. जाधव यांनी अनेकदा आपल्याला गर्भपात करण्यास भाग पाडले,त्यांच्या तावडीतून सुटत २०१३ मध्ये ही महिला खारघर येथे राहायला गेली व तिथेच एका मुलाला जन्म दिला मात्र त्यानंतर सुद्धा हा प्रकार थांबला नाही. उलट या गोष्टीला विरोध करताच जाधव यांनी मुलासहित आपल्याला मारहाण केली असे महिलेने सांगितले. याहीपेक्षा गंभीर म्हणजे या महिलेने जाधव यांच्यावर खुनाचा आरोप सुद्धा केला आहे, तिने दिलेल्या जबाबानुसार जाधव यांनी आपल्यासमोर एका तरुणीचा आणि तिच्या भावाचा खून केला असून त्यांना पुण्यात एका ठिकाणी गाडले असल्याचे सुद्धा समजत आहे.

धक्कादायक! दोन तरुणांचा पाळीव कुत्र्यावर पाशवी बलात्कार; रोज होणाऱ्या अत्याचारामुळे जनावराचा मृत्य

दरम्यान, या प्रकरणी पोलीस सध्या कसून तपास करत असून अनिल जाधव यांची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी पीडित महिलेचे वकील नितीन सातपुते यांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तूर्तास याप्रकरणी कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही, मात्र यामध्ये तथ्य असल्यास जाधव यांना बडतर्फ करण्यात येण्याची शक्यता आहे.