Yogi Adityanath and Sanjay Raut | Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचे 100 दिवस संपूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोद्धा दौर्‍यावर जाणार असल्याचे काही महिन्यांपूर्वी जाहिर करण्यात आलं होतं. त्यानुसार 6 मार्चला 100 दिवसांचा टप्पापूर्ण झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी अयोद्धेला रवाना होणार आहेत. या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर आज (5 मार्च) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)  यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान मैत्रीपूर्ण चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही; हनुमान गढीचे महंत राजू दास यांची धमकी

 संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्यासोबत उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍याच्या पूर्वतयारीबाबत चर्चा केली. दरम्यान काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना आपण अयोद्धा दौर्‍यावर जाणार असून भगवान श्रीरामाचे दर्शन आणि आशिर्वाद घेणार असल्याचं म्हटले होते. देवाचे दार सर्वांना खुले आहे. यामध्ये 'राजकारणाचा' प्रश्न नाही. ज्यांना इच्छा असेल त्यांनी आमच्यासोबत यावं असं खुलं निमंत्रण त्यांनी दिलं आहे.

संजय राऊत यांचे ट्वीट  

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी कुटुंबियांसोबत अयोद्धेमध्ये जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले होते. जून 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी 18 खासदारांसह हा दौरा केला होता. दरम्यान आता हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध दर्शवत 'उद्धव ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही,' अशी धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अयोद्धेमध्ये पोहचले आहेत.