Air India | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

AIR India या विमानसेवेच्या 120 वैमानिकांनी एकत्र राजीनामा दिल्याने तसेच तेल कंपन्यांनी पुरवठा बंद करण्याचा आदेश दिल्याने एअर इंडियासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मात्र कंपनीकडून विमान सेवा सुरळीत राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी एअर इंडियाकडून 18 ऑक्टोबर पर्यंत एक रक्कमी पैसे न मिळाल्यास पुढील आठवड्याभरात देशातील प्रमुख विमानतळावरील इंधनपुरवठा बंद करणार असल्याचा इशारा दिला आहे. यासोबतच वरिष्ठ वैमानिकांनी राजीनामा दिल्याने या हवाई कंपनीसमोरील संकट वाढले आहे.

एअर इंडियाच्या एअर बस A 320 च्या वैमानानिकांनी पदोन्नती न झाल्याने तसेच वेतनवाढीच्या मागणीसाठी राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. ANI शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने या वैमानिकांना कमी पैशावर कामाला ठेवले होते. 5 वर्षांच्या करारानंतर वैमानिकांना पदोन्नती आणि वेतनवाढीची आशा होती. मात्र कंपनीचा ढिसाळ व्यवहार पाहता राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. विमान सेवा पुरवणारी सरकारी कंपनी Air India ची होणार विक्री; कर्जामुळे 100 टक्के समभाग विकण्याचा प्रयत्न

रविवारी (15 ऑक्टोबर) रात्री कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाची विमानसेवा सुरळीत राहील असा दिलासा प्रवाशांना दिला आहे. सध्या एअर इंडियामध्ये 1200 हून अधिक वैमानिक आहेत. त्यापैकी 400 वरिष्ठ वैमानिक आहेत.