Afghanistan-Taliban Conflict: तालिबानने 12.3 दशलक्ष डॉलर आणि सोने मध्यवर्ती बँक दा अफगाणिस्तान बँकेला दिले परत
Representative image

तालिबानने (Taliban) प्रशासनाच्या माजी अधिकाऱ्यांच्या घरातून सापडलेले सुमारे 12.3 दशलक्ष डॉलर आणि काही सोने देशाच्या मध्यवर्ती बँक दा अफगाणिस्तान बँकेला (DAB) दिले आहे. अफगाणिस्तानच्या (Afghanistan) इस्लामिक अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी मालमत्ता राष्ट्रीय तिजोरीकडे सोपवून पारदर्शकतेसाठी त्यांची बांधिलकी सिद्ध केली,असे शिन्हुआ वृत्तसंस्थेने निवेदनाद्वारे म्हटले आहे.  मध्यवर्ती बँकेचे कार्यवाहक गव्हर्नर मोहम्मद इद्रीस (Governor Mohamed Idris) यांनी व्यापारी बँकांमध्ये अफगाणांच्या ठेवींच्या सुरक्षिततेचे आश्वासन दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. अफगाणिस्तान बँक आमच्या देशवासियांना आश्वासन देते की देशात कार्यरत असलेल्या सर्व व्यावसायिक बँका गंभीर देखरेखीखाली आहेत आणि त्यांचे कामकाज पूर्वीपेक्षा चांगले चालवत आहेत. बँका पूर्णपणे सुरक्षित आहेत, असे इद्रीस म्हणाले.

प्रदेश आणि जगातील सर्व व्यावसायिक बँका सहसा त्यांच्या भांडवलाचा 10% रोख म्हणून ठेवतात. उर्वरित विविध व्यावसायिक उपक्रमांमध्ये वापरतात आणि त्यांच्या लोकांना उपयुक्त सेवा देतात, असे निवेदनात म्हटले आहे. अफगाणिस्तानमधील व्यापारी बँका सरासरी 50% अफगाणी आणि परकीय चलन त्यांच्याकडे ठेवतात. त्यामुळे बँकिंग क्षेत्र चांगल्या स्थितीत आहे. हेही वाचा AUKUS: साम्राज्यवादी चीन विरोधात तीन देशांची आघाडी, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अमेरिका यांची रणनिती

गव्हर्नर पुढे म्हणाले, या बँकांनी अफगाणिस्तानच्या आर्थिक वाढीसाठी उपयुक्त भूमिका बजावण्यासाठी देश आणि परदेशात ठराविक रकमेची गुंतवणूक केली आहे.  ऑगस्टच्या मध्यावर तालिबानच्या ताब्यात आल्यापासून हजारो ग्राहक आपली बचत काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना हे विधान आले. अमेरिकेने अफगाणिस्तानच्या बँक मालमत्ता गोठवल्याच्या तसेच जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) निधी थांबवल्याच्या अहवालांमुळे अफगाणांमध्ये चिंता वाढली आहे.

गेल्या महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केल्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेने युद्धग्रस्त देशाला त्यांची मदत थांबवली. जी मुख्यत्वे विदेशी निधीच्या प्रवाहावर अवलंबून असते. काबूलमधील अहवालांनुसार, संयुक्त राष्ट्र संघाने अन्न आणि आवश्यक वस्तूंची गर्दी करण्यासाठी जागतिक प्रयत्नांना चालना देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले असतानाही अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या जवळ आहे.

28 ऑगस्ट रोजी मध्यवर्ती बँकेने देशातील सर्व बँकांना आदेश जारी केला. प्रत्येक आठवड्यात एका ग्राहकासाठी 200 किंवा 20,000 अफगाणी चलन काढण्याची तात्पुरती मर्यादा निश्चित केली. दरम्यान अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेच्या मालमत्तेवरील अमेरिकेची स्थगिती उठवण्यासाठी सरकार शक्य ते सर्व कायदेशीर पाऊल उचलणार आहे, असे तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी सांगितले.