Aditya Thackeray Meets Rahul Gandhi: विरोधी पक्षांच्या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे, अखेर शिवसेनेने कॉंग्रेसच्या नेतृत्वाला शांत करण्याच्या उद्देशाने उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांना बुधवारी राहुल गांधींची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये पाठवलं होतं. बुधवारी सकाळी राहुल गांधींची भेट घेण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी संध्याकाळी अहमद पटेल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि राज्यातील युती राजकारणाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. दरम्यान, महाराष्ट्रात सरकार स्थापनेनंतर दोन पक्षांच्या युवा नेत्यांमधील म्हणजेच राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्यामधील ही पहिलीच बैठक आहे.
दोन्ही नेत्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींना सरकारने नव्याने सुरू केलेल्या कामांविषयी माहिती दिली. सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यानंतर सीएए आणि एनपीआरच्या मुद्द्यांवर आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली.
दरम्यान, शिवसेनेने विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थिती दर्शविला नसल्याने, महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये अस्वस्थ वाढण्याची शक्यता होती. त्याचा राज्यातील सरकारवर परिणाम होऊ शकत होता. सूत्रांनी असेही सांगितले आहे की दिल्लीमध्ये सेनेचा कोणताही नेता विरोध पक्षांच्या बैठकीसाठी हजार नव्हते व प्रियांका चतुर्वेदी यांना देखील परत पाठवण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्याकडून देशवासियांना मकर संक्रांत सणाचा शुभेच्छा!
कॉंग्रेसने 23 आणि 26 जानेवारी रोजी होणाऱ्या सीएएला विरोध करण्याच्या कार्यक्रमाबद्दल सेनेला कळवले आहे. विरोधी पक्षांनी घेतलेल्या ठरावामध्ये सरकारला सीएए आणि एनपीआर मागे घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.