Gautam Adani | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अदानी समूहातील (Adani Group) अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनचा (APSEZ) शेअरच्या भावात दररोज वाढत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अदानी समूहाच्या शेअर्सवर चांगला परिणाम झाला असून कंपनीच्या शेअरने आत्तापर्यंत सर्वकालीन उच्चांकावर धडक मारली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे बीएसईवर (BSE) व्यवहार करताना शेअर सुमारे 5% उडी घेऊन 1,229.90 रुपयांवर पोहोचला असून शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत, मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) या ब्रोकरेजने स्टॉकची लक्ष्य किंमत 1,410 रुपये निश्चित केली, जी सोमवारच्या बंद किंमतीपेक्षा 21% अधिक आहे. (हेही वाचा - SEBI Bans Naked Short Selling: नेकेड शॉर्ट सेलिंग नियमात बदल, संस्थात्मक गुंतवणूकदाराला डे ट्रेडिंग करण्यास परवानगी नाही- सेबी)

देशातील सर्वात मोठ्या बंदर कंपनीची यंदाच्या आर्थिक वर्षात कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली असेल, असा अंदाज वर्तवला असून तिसऱ्या तिमाहीत कंपनीचे प्रमाण 42% वाढले आणि आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत ते 331 MMT वर पोहोचले जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 टक्के अधिक आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल आल्यापासून APSEZ शेअरची किंमत 395.10 रुपयांपर्यंत कोसळली, परंतु तेव्हापासून स्टॉकने 200 टक्के उसळी घेतली. बीएसईवर आज दुपारी 1.45 वाजता स्टॉक 2.89 टक्के वाढीसह 1,202.45 रुपयांवर व्यवहार करत होता. अशा परिस्थितीत, या शेअरचा नीचांक 394.95 रुपये असून गेल्या वर्षी 3 फेब्रुवारीला कंपनीच्या शेअर नीचांकी गाठली.