Acid Attack: विवाहित प्रेयसीने नाते मोडल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने केला अॅसिड हल्ला, अटक
Arrest. Representational Image. (Photo Credit: ANI)

पश्चिम बंगाल मधील हुगली जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित प्रेयसीने नाते मोडल्याने प्रियकराने तिच्यावर अॅसिड हल्ला केला. त्याचवेळी महिलेने आपला चेहरा कपड्याने झाकल्याने सुदैवाने ती बचावली. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.(Crime: चित्रपटात काम करण्याची आवड मध्य प्रदेशातील महिलेला पडली महागात, मुंबईतील एका व्यक्तीने चित्रपट बनवण्याच्या बहाण्याने उकळले 10 लाख)

हल्ला करताना महिलेने आरडाओरड केल्याने स्थानिक लोक एकत्रित आले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. चौकशीत आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे.

पोलिसांच्या सुत्रांनुसार आरोपी विश्वनाथ भंडारी कोन्नगर रोड येथे राहणाारा आहे. त्याचे एका महिलेसोबत रिलेशनशिप ठेवण्यासाठी संपर्कात होता. परंतु महिलेने ते मोडल्याने तो संतप्त झाला. यामुळे त्याने तिच्यावर अॅसिड हल्ला केला. महिलेच्या सासुने असे म्हटले की, शुक्रवारी रात्री तरुण घराच्या मागील दरवाजाने आतमध्ये आला आणि तिच्यावर अॅसिड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुनेने आपल्या साडीने चेहरा झाकल्याने अॅसिड तिच्या हातापायावर पडले. घटनेनंतर जेव्हा आरडाओरड केली तेव्हा शेजारची माणसे धावत आली. त्यांना महिलेसह तिच्या वृद्ध आईला वाचवत पोलिसांना याबद्दल कळवले.(Pune: अल्पवयीन नेपाळी नागरिकावर बलात्कार आणि विनयभंग करणाऱ्या तीन आरोपींना 11 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी)

आरोपीने पोलिसांना असे म्हटले की, त्याचे महिलेसोबत अफेअर सुरु होते. परंतु या नात्यातून बाहेर पडण्यासाठी महिलेने ते मोडले. महिलेला अद्दल घडवण्यासाठी त्याने अॅसिड हल्ला केल्याचे कबूल केले. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.