Crime: चित्रपटात काम करण्याची आवड मध्य प्रदेशातील महिलेला पडली महागात, मुंबईतील एका व्यक्तीने चित्रपट बनवण्याच्या बहाण्याने उकळले 10 लाख
fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

मध्य प्रदेशातील शहडोल (Shahdol) जिल्ह्यातील एक महिला चित्रपटाची (Movie) नायिका बनण्याच्या  नादात फसवणुकीची (Fraud) बळी ठरली. या चित्रपटात मुख्य भूमिका देण्याच्या बहाण्याने मुंबईतील (Mumbai) एका रहिवाशाने कोटमा (Kotma) येथील महिलेची 10 लाख रुपयांची फसवणूक केली. या भामट्याने पैसे घेऊन चित्रपटाचे बनावट चित्रीकरणही करून घेतले. मात्र दीड वर्षानंतरही चित्रपट प्रदर्शित न झाल्याने महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी कोतवाली शहडोल येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहडोल कोतवालीचे स्टेशन प्रभारी रत्नंबर शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता शर्मा पती शैलेंद्र शर्मासह कोटमा जिल्ह्यातील अनुपपूरमध्ये (Anuppur) राहत आहेत. तिला चित्रपट आणि टीव्हीमध्ये काम करण्याची आवड होती.

या कामाच्या संदर्भात तिची ओळख मुंबईतील मनीष चिमणलाल यांच्याशी झाली. मनीषने सांगितले होते की, शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवण्यासाठी त्याचे प्रोडक्शन हाऊस आहे. श्वेताने एक चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली. ज्यामध्ये तिची मुख्य भूमिका आहे. मनीषने ते मान्य केले. मनीष चित्रपट बनवण्यासाठी शहडोलला पोहोचला होता. येथे 14 ऑक्टोबर 2020 रोजी त्याचा श्वेतासोबत करार झाला. त्याने श्वेताला चित्रपटासाठी 10 लाख रुपये गुंतवण्यास सांगितले. हेही वाचा  Pune Online Fraud: ओएलएक्सवर सोफा सेट विकणे पुण्यातील महिलेला पडले महागात, अज्ञाताने घातला 84,504 रुपयांचा गंडा

श्वेताने यासाठी होकार दिला आणि शहडोलमध्येच मनीषला 10 लाख रुपये दिले.  यानंतर चित्रपटाचे शूटिंगही अहमदाबादमध्ये झाले. पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, शूटिंग सुरू असतानाही मनीषने चित्रपट प्रदर्शित केला नाही किंवा पैसे परत केले नाहीत. श्वेताच्या तक्रारीनंतर शहडोल कोतवाली येथील मनीष चिमणलाल याच्याविरुद्ध कलम 420 चा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.