Aam Aadmi Party: उत्तर प्रदेश, गोवा राज्यांसाठी आम आदमी पक्षाकडून संयोजकांची घोषणा
AAP Logo | (Photo Credits: Facebook)

आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) दिल्लीबाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पक्षाने या आधी पंजाब आणि तर काही राज्यात निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला. त्यानंत आप आता उत्तर प्रदेश ( Uttar Pradesh) आणि गोव्याकडे विशेष लक्ष देताना दिसतो आहे. पक्षाने नुकतीच उत्तर प्रदेश आणि गोवा (Goa) राज्यांसाठी संयोजकांचीही (AAP Organizers) घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाने उत्तर प्रदेशसह इतर काही राज्यांमध्ये विधानसभेसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याची घोषणा केली आहे. म्हणूनच पक्षाने संयोजकांचीही घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाने गोवा आणि उत्तर प्रदेश राज्यासाठी गोपाल इटालिया आणि राहुल मम्बरे यांची नियुक्ती केली आहे. हे दोन्ही संयोजक अनुक्रमे गोवा आणि उत्तर प्रदेश संयोजक पदाची जबाबदारी पार पाडतील. ही नियुक्ती सर्वानुमते करण्यात आल्याचे पक्षाने म्हटले आहे.

संयोजकांच्या पदांसोबतच पक्षाने प्रवक्त्यांची नावेही घोषीत केली आहेत. पक्षाने आजीत त्यागी आणि आशुतोष सेंगर यांना उत्तर प्रदेश राज्यासाठी प्रवक्ता म्हणून निवडले आहे. तर सुरेश तिळवे आणि वाल्मीकि नाइक यांना गोव्यासाठी आपने प्रवक्ता म्हणून निवडले आहे. गुजरातमध्ये हीच जबाबदारी राजेश शर्मा सांभाळतील. (हेही वाचा, Dapkyal Gram Panchayat Election: लातूर जिल्ह्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत 'आप'चा झेंडा फडकला; कार्यकर्त्यांच्या ट्विटला अरविंद केजरीवाल यांचा मराठीतून रिप्लाय)

दरम्यान, आम आदमी पक्षाने सोशल मीडिया टीमचाही विस्तार केला असून, त्यात काही नवे सदस्य समाविष्ठ केले आहेत. पुलकीत शर्मा यांना विकास केडिया यांच्यासोबत राष्ट्रीय सोशल मीडिया कोऑर्डिनेटर पदाची जबाबदारी दिली आहे.