आधार कार्डसाठी मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड नसतानाही 'या' पद्धतीने करा डाऊनलोड
Aadhar Card (Photo Credits: PTI)

सध्या आधार कार्ड (Aadhar Card)  ही प्रत्येक भारतीय नागरिकाचे ओळख बनली आहे. तसेच आधार कार्ड हे विविध सरकारी कामांसहअन्य महत्वाच्या कामामध्ये एखाद्या व्यक्तीची ओळख म्हणून पुरावा सादर केला जातो. तर आता UIDAI यांनी आता नागरिकांना ऑर्डर आधार रीप्रिंट सेवा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुसार तुमचा आधार कार्डवरील मोबाईल क्रमांक जोडलेला किंवा बदललेला असल्यास तरीसुद्धा तुम्हाला ते पुन्हा कार्ड प्रिंट करता येणार आहे.

त्यामुळे आता तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डसोबत रजिस्टर्ड नसल्यास या पद्धतीने तुम्हाला ते डाऊनलोड करता येणार आहे. तसेच आधार कार्ड रिप्रिंट केल्यावर तुमच्या आधार कार्डवरील पत्त्यावर पाठवले जाणार आहे.

प्रथम www.uidai.gov.in किंवा resident.uidai.gov.in च्या संकेतस्थळाला भेट द्या.

>त्यानंतर Order Aadhaar Reprint ऑप्शनवर क्लिक करा

>तुमचा 12 चा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सिक्युरिटी कोड दाखवला जाईल तो भरा.

>जर तुमच्याकडे रजिस्टर नंबर नसेल, तर त्या ठिकाणी दिलेल्या बॉक्सवर क्लिक करा आणि येथे कोणता दुसरा नंबर असेल तो टाका.

> Send OTP वर क्लिक करा आणि तुमच्या मोबाइलवर आलेला OTP टाकून व्हेरिफिकेशन प्रोसेस करा.

> तुम्हाला येथे आधार कार्डचे एकदा फायनल प्रिव्ह्यूही पाहायला मिळणार आहे.

>प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर मेक पेमेंट ऑप्शनवर क्लिक करुन आधार रिप्रिंटचे शुल्क भरा.

> शुल्क भरल्यावर रिसीप्ट जनरेट होईल, त्यामुळे तुम्ही पीडीएफ फॉर्मेटमध्ये डाऊनलोड करु शकता. त्यासोबतच तुम्हाला SMS च्या माध्यमातून सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (SRN) मिळेल.

> 10 ते 15 दिवसानंतर तुम्हाला तुमचे आधारकार्ड मिळेल, तुम्ही तुमच्या आधार कार्डची डिलीव्हरीही ट्रॅक करु शकता.

(IRCTC सोबत आधार कार्ड कसे लिंक करावे? 12 तिकिटांसाठी बुकिंग करता येणार)

आधार कार्ड संबंधित ही प्रक्रिया तुमचे नातेवाईक किंवा एखाद्या व्यक्तीला आधार कार्ड रिप्रिंट करुन हवे असल्यास तर वापरु शकता. तसेच आधार कार्ड संबंधित अधिक माहिती हवी असल्यास त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.