धक्कादायक! भावोजींच्या प्रेमात असलेल्या मेव्हणीने आपल्याच पतीचे अपहरण करून केली निर्घृण हत्या, 8 महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
Representational Image (Photo Credits: Facebook)

बिहारच्या (Bihar) पूर्णिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका मेव्हणीने भावोजीवर असलेल्या प्रेमाखातर आपल्याच पतीचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार,स या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह इतर चौघांना अटक केली आहे. चार आरोपींनी मंगळवारी सायंकाळी सायकलवरुन जात असलेल्या आरोपी महिलेच्या पतीचे अपहरण केले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्याला धमदाहा येथे नेत असताना वाटेतच गळा आवळून त्याची हत्या केली. यानंतर मृतदेह हा धमदाहा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तुलसी कुडीया येथे फेकून दिला. बाबुल असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबुलच्या आईने बाबुलच्या पत्नीवर खूनाचा आरोप केला आहे. बाबुलच्या आईने म्हटलं की, बाबुलच्या पत्नीचे आपल्या भावोजींसोबत अनैतिक संबंध होते. यावरुन पंचायत सुद्धा बसवण्यात आली होती मात्र, पंचायतीसमोर तिच्या भावोजींनी असं काही नाहीये म्हटलं.हेदेखील वाचा- नवी मुंबई: छेड काढल्याची पोलिसात तक्रार केल्याने पीडित तरुणीसह तिच्या भावावर माथेफिरू कुटूंबाने केले कोयत्याने वार, भावंडांची प्रकृती चिंताजनक

बाबुलची पत्नी आणि तिच्या भावोजींनी बाबुलचं अपहरण करुन त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे बाबुलचा आठ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.

मुफस्सिल पोलीस स्टेशनचे प्रभारी आदित्य रंजन यांना बाबुल याच्या अपहरणाची माहिती मिळाली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना बाबुलचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी बाबुलची पत्नी, तिचे भावोजींसह चौघांना या प्रकरणात ताब्यात घेतलं. यानंतर चौकशीत आरोपींनी गुन्हा कबूल केला. ज्या स्कॉर्पिओतून बाबुलचं अपहरण करण्यात आलं होतं ती सुद्धा जप्त करण्यात आली आहे.