Himachal Pradesh Landslide. (Photo Credits: Twitter)

हिमाचलच्या किन्नौर भागामध्ये आज (11 ऑगस्ट) दरड कोसळली आहे. ही दरड रिकांग पियो-शिमला राजमार्ग या ठिकाणी झाली असून बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे. ANI शी बोलताना ITBP ने दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेमध्ये एका बस सह 4 वाहनं दबल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये 40 पेक्षा अधिक लोकांचा समावेश असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह स्वतः या दुर्घटनेकडे जातीने लक्ष ठेवून आहेत आणि योग्य ती मदत पोहचवण्याचं काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार प्रवासी बस हरिद्वारला जात होती त्यामध्ये 30-35 लोकं असल्याची शक्यता आहे. या बसचा ड्रायव्हर बचावला असल्याचेही सांगण्यात आले आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने या ठिकाणी बचावकार्य सुरू झालं आहे.आयटीबीपीचे जवान देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. नक्की वाचा: Himachal Pradesh: धक्कादायक! डोंगरावरून अचानक होऊ लागला दगडांचा वर्षाव, 9 पर्यटकांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी, पहा अंगावर काटा आणणारा Video.

बस चालकाच्या माहितीनुसार अचानक दरड कोसळल्याने तोल जाऊन ती सतलज नदीत कोसळली आहे. या दुर्घटनेमधील बस ही हिमाचल रोडवेजची आहे. भारतीय सेना आणि एनडीआरएफ देखील मदतीसाठी रवाना झालेले आहे.

थरारक  व्हिडीओ

सध्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये सातत्याने दरडी कोसळत आहेत. सातत्याने या भागात बरसत असलेल्या पावसामुळे मागील काही दिवसांत दरड कोसळण्याचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळालं आहे.