Live
सेव्हन हिल्स रुग्णालयात 60 वर्षांच्या COVID 19 रुग्णाच्या आत्महत्येप्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा रिपोर्ट दाखल ; 9 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
May 09, 2020 11:55 PM IST
काल (8 मे) औरंगाबाद येथे झालेल्या 16 मजूरांचा अपघाती मृत्यूने सर्वांचे हृदय पिळवटून टाकले. दरम्यान काल रात्री त्यांचे मृतदेह श्रमिक ट्रेन मार्फत मध्य प्रदेशला पाठवण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व चौकशी पूर्ण झाली आहे. अशी माहिती औरंगाबाद ग्रामीण च्या एसपी मोक्षदा पाटील यांनी दिली आहे.
भारतभर कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोना बाधितांची वाढणारी संख्या यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा कालावधी अवघ्या काही दिवसांनंतर संपेल. त्यानंतर पुढे काय हा प्रश्न जनतेला पडला आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक असल्याने राज्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर पुणे, पिंपरी-चिंचवड भागातील कन्टेन्मेंट झोनमध्ये 10 ते 17 मे पर्यंत लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान कोरोना व्हायरसचा कहर अमेरिकेत सर्वाधिक पाहायला मिळत आहे. तेथील कोरोना बाधितांची तसंच कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. पेन्सचे प्रेस सेक्रेटरी Katie Miller यांची देखील कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. कोरोनाची लागण झालेले व्हाईट हाऊसमधील हे दुसरे सदस्य आहेत. अशी माहिती AFP वृत्तसंस्थेने दिली आहे.