नाशिक मधील हेडकॉन्टेबल यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन, महाराष्ट्र पोलिसांनी वाहिली श्रद्धांजली
Maharashtra Police (Photo Credits: Twitter/ ANI)

देशभरासह महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर वैद्यकिय कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा अहोरात्र रस्त्यावर गस्त घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. याच दरम्यान, आता नाशिक (Nashik) मधील पोलिसांच्या हेडक्वार्टर्समधील पोलीस कॉन्स्टेबल यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. यामुळे समस्त महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी आम्ही परिवाराच्या दुखात सहभाही असल्याचे ही म्हटले आहे.

महाराष्ट्र पोलीस यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, नाशिक मधील हेडकॉन्टेबल साहेबराव झिप्रू खरे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या आत्माला शांती लाभो अशी प्रार्थना सुद्धा डीजीपी आणि सर्व स्तरातील महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या दुखात सहभागी असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी सुद्धा कोरोना व्हायरसमुळे मुंबईतील 3 पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मृत झालेल्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या परिवाराला प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरी सुद्धा देणार असल्याचे ही म्हटले होते. सध्या 55 वर्षावरील पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या परिस्थितीत काम करणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्वीकारला पदभार; सर्वप्रथम केले 'हे' काम!)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला . त्यावेळी त्यांनी असे म्हटले आहे की, राज्यातील पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना आराम मिळावा म्हणून केंद्राकडून मनुष्यबळ मागवण्याचा विचार करण्यात येणार आहे. मात्र मुंबईत लष्कर बोलावणार असल्याची अफवा असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारला कोरोनाचा वेग संथ करण्यास यश आले आहे. परंतु अद्याप कोरोनाची साखळी तुटलेली नाही असे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.