स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे लहान मुलांचे तुटले दात, 9 मुले एम्स रुग्णालयात दाखल
Kids with smartphones (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

पालकांनो सावधान! आजवर तुम्ही स्मार्टफोनच्या (Smartphone) अतिवापरामुळे लहान मुलांचे (Kids) डोळे खराब झाल्याचे ऐकले असेल पण आता याच स्मार्टफोनच्या वापरामुळे लहान मुलांचे दातही पडू शकतात. विश्वास बसत नाही ना; पण हे खरे आहे. मात्र असं घडलय दिल्लीमध्ये. लोकमत ने दिलेल्या रिपोर्टनुसार, येथे स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे एक नाही, दोन नाही तर जवळपास 9 लहान मुलांचे दात तुटले असून त्यांनी एम्स (AIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही मुले 3 ते 8 वयोगटातील आहेत.

झाले असे की, ही मुले झोपून मोबाईलवर गेम खेळत होती. त्यावेळी अचानक मोबाईल निसटून त्यांच्या तोंडावर पडला. ज्यामुळे त्यातील 2 मुलांचे दात तुटले असून काहींचे ओठ फाटले, काहींचे दात हलले तर काहींना तोंडाला जखमा झाल्या. इतकचं नव्हे तर यात ज्यांचे ओठ फाटले त्यांच्या ओठाला टाके देखील घालावे लागले, असे येथील डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा- कोल्हापूर: गेम खेळताना मोबाईलचा स्फोट झाल्याने मुलाने डोळा गमावला

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांना झोपून मोबाईलवर गेम खेळण्याचे वेडं असते. तोंडासमोर मोबाईल धरलेला असताना अनेकदा हा मोबाईल त्यांच्या तोंडावर पडतो. एका मोबाईलचे वजन साधारण 170 ते 250 ग्रॅम असते. यामुळे फोन मुलांच्या हातातून निसटल्यास थेट तोंडावर पडून त्यांना इजा होते.

मात्र हा प्रकार खूप गंभीर असून पालकांनी याकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये असा सल्ला एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला आहे. जर तुमच्या मुलाला मोबाईलचे वेड असेल तर त्वरित सावध होऊन त्याला मोबाईलपासून दूर ठेवा. असेही ते म्हणाले.