मोबाईलचा स्फोट ( फोटो सौजन्य - फाइल इमेज )

कोल्हापूर (Kolhapur) येथे मोबाईलवर गेम खेळत असताना अचानक स्फोट होऊन मुलाने आपला डोळा गमावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अमोल पाटील असे या मुलाचे नाव आहे.

कगल तालुक्यात अमोल राहत असून त्याच्या घरातील मंडळी कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी अमोल एकटाच घरात मोबाईवर गेम खेळत बसला होता. मात्र गेम खेळताना मोबाईल प्रचंड गरम होऊन त्याचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे त्याच्या डोळ्यात मोबाईलचा एक तुकडा डोळ्यात गेला. या प्रकरणी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याचा डोळा निकामी झाला असल्याचे त्याच्या घरातील मंडळींना सांगितले. यामुळे गावातील अन्य जणांना धक्का बसला आहे.(Whatsapp ची कमाल! मुंबईमधून हरवलेल्या चिमुरड्याची अडीच वर्षानंतर कुटुंबात वापसी)

तसेच अमोल याच्या हाताला सुद्धा जखम झाली आहे. त्यामुळे आपण जेव्हा मोबाईलवर सातत्याने गेम खेळत राहिल्याने तो गरम होते. परंतु त्याकडे आपले लक्ष न जाता आपण गेम खेळत राहतो. त्यामुळे अशा घटना गेल्या काही दिवसात घडून येत आहेत.