Whatsapp ची कमाल! मुंबईमधून हरवलेल्या चिमुरड्याची अडीच वर्षानंतर कुटुंबात वापसी
WhatsApp (Photo Credits: Pixabay)

सोशल मीडिया किंवा एकंदरीतच तंत्रज्ञानाने माणूस माणसापासून तुटू लागलाय अशी एक सामान्य तक्रार नेहमीच ऐकू येते. पण अलीकडे मुंबईत एका कुटुंबाला आपला हरवलेला चिमुकला व्हाट्सऍपच्या ग्रुप मुळे तब्बल अडीच वर्षाने परत भेटला आहे. शुभम मांडवकर (Shubham Mandavkar) हा साडे पाच वर्षीय मुलगा आपल्या घरी परतल्यामुळे मांडवकर कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाहीये. कुर्ल्याच्या (Kurla)  नेहरूनगर (Nehrunagar)  परिसरातुन अडीच वर्षांपूर्वी शुभम बेपत्ता झाला होता, त्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) महाराष्ट्र पोलिसांच्या व्हाट्सऍप ग्रुपवर या मुलाची माहिती व फोटो शेअर केला होता. या माहितीवरून शुभमचा शोध घेऊन अडीच वर्षानंतर पोलिसांनी या मुलाची आपल्या कुटुंबाशी भेट घडवून दिली.

22 मार्च 2016 रोजी शुभम हा 3 वर्षाचा असताना कुर्ल्यात परिवारासोबत बाहेर फिरायला गेला होता त्यावेळी नेहरूनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीतून तो हरवला, शुभमच्या आईवडिलांनी याबाबाबत नेहरूनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती मात्र त्यानंतर अडीच वर्ष मुलांबाबत कोणतीच माहिती न मिळाल्याने मांडवकर कुटुंबाच्या वाट्याला दुःख आणि निराशा आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना रेल्वे सुरक्षे दलाच्या व्हाट्सऍप ग्रुपवरून शुभांशी साधर्म्य माहिती असणाऱ्या मुलाविषयी समजलं त्यांनतर शुभमच्या शोधाला गती मिळाली.

शुभम हा तीन वर्षच असताना हरवल्यामुळे आता त्याच्या जुन्या फोटोवरून ओळख पटवणं तसं कठीण होतं पण अगदी मिळतीजुळती माहिती असलेला मुलगा अकोल्याच्या उत्कर्ष शिशु गृह मध्ये असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.येत्या 5 महिन्यांत सुरु होणार Whatsapp Pay; आता पैसे पाठवणे होणार आणखी सोपे

 

याबाबत माहिती कळताच मांडवकर कुटुंबीय अकोल्याला रवाना झाले, तिथे जाताच आईवडील व शुभम या दोघांनीही एकमेकांना ओळखले आणि सुमारे अडीच वर्षानंतर या हरवलेल्या चिमुरड्याची आपल्या कुटुंबाशी भेट घडली. शुभमचे वडील विकी यांनी अश्रू भरल्या डोळ्यांनी पोलिसांचे आभार मानले.