अमृतमहोत्सव ( Amrit Mahotsav) हा काही नवे शिकण्यासोबतच काहीतरी नवे करण्याची प्रेरणा देतो, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'मन की बात' या कार्यक्रमातून काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा 'मन की बात' (Mann ki Baat) कार्यक्रमाचा हा सलग 83 वा भाग होता. देशातील सर्वसामान्य नागरिक असो अथवा ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत, अमृतमहोत्सवाचीच चर्चा आहे. सर्वत्र अमृतमहोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याचेही ते म्हणाले. 'मन की बात' या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी काय बोलतात याकडे सर्व देशाचे लक्ष लागलेले असते. या कार्यक्रमात पंतप्रधान विविध विषयांवर भाष्य करतात.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, डिसेंबर महिन्यात नेवी डे (Navy Day) आणि आर्म्ड फोर्स फ्लैग डे (Armed Forces Flag Day) सुद्धा देश साजरा करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे 16 डिसेंबर ला 1971 च्या युद्धाची स्वर्णिम जयंती वर्षही देश साजरो करतो आहे. या सर्व काळात देश आपल्या लष्करी ताकतीची स्मरण करतो. स्वातंत्र्यात सर्व जातीधर्माच्या नागरिकांन योगदान दिले. त्यासाठी देशाने सर्वधर्म गौरवही साजरा केला. देशात वेगवेगळ्या भागात याबाबत कार्यक्रम झाले. (हेही वाचा, Mann Ki Baat Live Streaming: 'मन की बात' पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांशी साधणार संवाद; कृषी कायदे, संसद अधिवेशन, कोरोना व्हायरस मुद्द्यांवर भाष्य, इथे पाहा थेट भाषण)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (28 नोव्हेंबर) आकाशवाणीवरुन मन की बात कार्यक्रमात देश-विदेशातील लोकांसोबत आपले विचार शेअर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा हा खास कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित होतो. आज 'मन की बात' कार्यक्रमाचा 83वा भाग होता. हा कार्यक्रमक 2021 या वर्षात 11 वेळा प्रसारीत होईल. आजही हा कार्यक्रम कार्यक्रम सकाळी 11 वाजता इंडियन रेडिओ, दूरदर्शन, ऑल इंडिया रेडियो न्यूज आणि मोबाईलअॅप आदींवर प्रसारित झाला. या कार्याक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशवासियांसोबत संवाद करतात. या संवादात विविध मुद्द्यांवर भाष्य करतात.