फ्लिपकार्ट'च्या तंत्रप्रणालीमध्ये मराठी भाषेचा समावेश झाल्यानंतर मनसेकडून 'अशी' प्रतिक्रिया ; 8 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
Jan 08, 2021 11:29 PM IST
अमेरिकेतील संसद कॅप्टॉलच्या बाहेर गुरुवारी डोनाल्ड ट्रंम्प यांच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्यानंतर त्या घटनेचे प्रतिसाद सर्वत्र उमटले गेले. तसेच डोनाल्ड ट्रंम्प यांनी अखेर आपला पराभव स्विकारुन येत्या 20 जानेवारीला अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना शांतिपूर्ण आणि सुव्यवस्थेने सत्ता हस्तांतरित करणार असल्याचे म्हटले आहे. कालच्या प्रकारावरुन डोनाल्ड ट्रंम्प यांनी सर्व अमेरिकन प्रमाणेच मी सुद्धा हिंसाचार करत संताप व्यक्त केल्याचे म्हटले आहे. तर संसदेत कार्यकर्त्यांकडून घालण्यात येणाऱ्या धुडगूसीवर नियंत्रण मिळण्यासाठी मी राष्ट्रीय संरक्षक आणि फेडरल कायद्याची अंमलबाजवणी करणाऱ्यांनी तेथे तैनात केले. पुढे डोनाल्ड ट्रंम्प यांनी अमेरिका नेहमीच कायदा व सुव्यस्था राखणारे राष्ट्र असले पाहिजे असे ही त्यांनी म्हटले.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आज महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांसह 25 महापालिका क्षेत्रात कोरोनावरील लसीकरणाचे ड्राय रन होणार आहे. या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिक माहिती देत असे म्हटले की, प्रत्येक जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्रे आणि महानगरपालिका क्षेत्रातील एक आरोग्य केंद्रावर ड्राय रन पार पाडले जाणार आहे. याआधी सुद्धा राज्यातील पुणे, नंदुरबार, जालना आणि नागपूरसह अन्य काही ठिकाणी ड्रान रन केले गेले.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कर्नाटक मधल डॉक्टरांच्या क्वार्टर्समध्ये बिबट्या दिसून आल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. तर रात्रीच्या वेळची ही घटना असून तो क्वार्टर्समध्ये मुक्तपणे फिरताना दिसल्याने आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.