प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

देशाचे अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे 10 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून खुशखबर मिळणार आहे. कारण यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांच्या DA आणि किमान वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे. जर असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीसोबत महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी अधिक वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनात 700 ते 10 हजार रुपयांची वाढ होईल. तसेच किमान वेतन 18 हजार रुपये असल्यास आणि त्यात आणखी वाढ केल्यास 26 हजार रुपये होईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय कर्मचारी त्यांच्या वेतनात वाढ करावी अशी मागणी करत आहेत. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी DA बाबत निर्णय न घेतल्यास, तर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मार्च महिन्यात याबबात निर्णय घेण्यात येईल. DA मध्ये 17 टक्क्यांवरुन 21 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.(7th Pay Commission: अर्थसंकल्प 2020 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार खुशखबर, 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत पगारात वाढ होण्याची शक्यता)

भारतामध्ये जुलै 2019 ते ऑक्टोबर 2019 या काळात महागाईचा आकडा 3 पॉंईंटने वधारला त्यामुळे डीएमध्ये 4% वाढ म्हणजेच एकूण पगारात अंदाजे 720 ते 10,000 रूपये वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान कर्मचार्‍यांच्या पे स्केल आणि विविध राज्यांप्रमाणे पगाराचं स्वरूप आणि त्यामध्ये होणारी वाढ ही वेगवेगळी असू शकते.डीएच्या वाढीसोबतच सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, किमान वेतन देखील वाढवण्याची केंद्रीय कर्मचार्‍यांची मागणी आहे. यासोबतच फीटमेंट फॅक्टरदेखील बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या वर्षात मोदी सरकार देशभरातील लाखो कर्मचार्‍यांना आणि पेंशन धारकांना मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे.