7th Pay Commission: अर्थसंकल्प 2020 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार खुशखबर, 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत पगारात वाढ होण्याची शक्यता
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यंदाचे नव वर्ष एकदम खास असणार आहे, कारण मोदी सरकार (Modi Government) यंदाच्या अर्थसंकल्प 2020 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे 7 व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना पगार मिळू शकतो.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यंदाचे नव वर्ष एकदम खास असणार आहे, कारण मोदी सरकार (Modi Government) यंदाच्या अर्थसंकल्प 2020 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे 7 व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना पगार मिळू शकतो. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक आणि महागाई भत्त्यात वाढ करु शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानुसार देशभरातील 1.1 करोड पेक्षा अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीत 8 हजार रुपयांची वाढ झाल्यास त्यांचे वेतन 18 हजारावरुन 26 हजार रुपये होऊ शकतो. वेतन वाढीसोबत महाभागई भत्त्यात सुद्धा वाढ करण्यात येईल. गेल्या काही काळापासून केंद्रीय कर्मचारी त्यांचा पगारात वाढ करावी अशी मागणी वारंवार करत आहेत. असे ही म्हटले जात आहे की, सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केली जाऊ शकते. सध्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 18 हजार रुपये आहे. महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी अधिक वाढ केली जाऊ शकते.(7th Pay Commission:रेल्वे कर्मचार्यांसाठी 2019 वर्ष ठरलं लाभदायी; पगारात झाली 'इतकी' दमदार वाढ)
मोदी सरकार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत DA मध्ये सुद्धा 4 टक्क्यांनी वाढ करु शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात 720 ते 10 रुपयांनी अधिक वाढ होईल. भारतामध्ये जुलै 2019 ते ऑक्टोबर 2019 या काळात महागाईचा आकडा 3 पॉंईंटने वधारला त्यामुळे डीएमध्ये 4% वाढ म्हणजेच एकूण पगारात अंदाजे 720 ते 10,000 रूपये वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान कर्मचार्यांच्या पे स्केल आणि विविध राज्यांप्रमाणे पगाराचं स्वरूप आणि त्यामध्ये होणारी वाढ ही वेगवेगळी असू शकते.डीएच्या वाढीसोबतच सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, किमान वेतन देखील वाढवण्याची केंद्रीय कर्मचार्यांची मागणी आहे. यासोबतच फीटमेंट फॅक्टरदेखील बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या वर्षात मोदी सरकार देशभरातील लाखो कर्मचार्यांना आणि पेंशन धारकांना मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 22, 2020 09:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

