7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्‍यांना या महिन्यात मिळू शकते डबल गूडन्यूज; इथे पहा डिटेल्स
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

भारतामध्ये आता कोरोना वायरस संकटाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) मंदावत आहे. सरकार आणि आरोग्य यंत्रणेसाठी देखील ही दिलासाची बाब आहे. हळूहळू अर्थचक्र आणि नियमित व्यवहार पुन्हा वेगवान होण्यास सुरूवात झाली आहे. आता सरकारी कर्मचार्‍यांसाठी लवकरच पगारवाढीची मोठी खूषखबर मिळण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, सातव्या वेतन आयोगाच्या (7th CPC) शिफरसी नुसार, वेतन आणि महागाई भत्त्यामध्ये वाढ मिळणार्‍या देशातील लाखो केंद्रीय कर्मचार्‍यांना या महिन्यात डबल गूडन्यूज मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकार लवकरच जुलै ते डिसेंबर 2021 साठी महागाई भत्त्यामध्ये मिळणार्‍या वाढीची घोषणा करू शकते. यासोबतच एरियर्स म्हणजे थकीत महागाई भत्त्याच्या वाढी बाबतही या महिन्यात महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर मोदी सरकाराकडून एरियर्सला मंजुरी आणि डीए मध्ये वाढ अशा घोषणा झाल्या तर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही दिवाळी असणार आहे. 7th Pay Commission Latest Update: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! Basic Pay मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता.

केंद्र सरकार वर्षातून दोनदा सरकारी कर्मचार्‍यांच्या डीए मध्ये वाढ करते. सरकारने आतापर्यंत जुलै ते डिसेंबर 2021 या सहामाहीसाठी डीए मध्ये वाढीची घोषणा केलेली नाही. दरम्यान कर्मचार्‍यांकडून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीच्या अनुसार चर्चा करणार्‍या शिव गोपाल मिश्रा (Shiv Gopal Mishra)यांच्या माहितीनुसार, डीए मध्ये 4% वाढ होण्याची शक्यता आहे.

एका रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यच्या तिसर्‍या आठवड्यामध्ये केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचे प्रतिनिधित्त्व करणार्‍या JCM ची राष्ट्रीय परिषद सदस्य आणि अर्थ मंत्रालय, डीओपीटी सोबत एक बैठक होणार आहे.

मागील वर्षी केंद्र सरकारने कोविड19 संकटा मध्ये 1 जानेवारी, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 च्या डीएला फ्रीज करण्यात आले आहे. दरम्यान आता जुलै 2021 पासून महागाई भत्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यताअ आहे. तसेच मागील 3 टप्प्यांतील डीए देखील मिळणार आहे.