7th Pay Commission | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचे हित विचारात घेऊन विविध नियमांमध्ये बदल केला आहे. भारतीय रेल्वे (Indian Railway) ने दिलासा देत रात्रपाळी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 'नाइट ड्यूटी अलाउंस' (Night Duty Allowance) बाबत मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने नुकताच कर्मचाऱ्यांसाठी (Railway Employees) नाईट अलाऊन्स देण्याचे जाहीर केले आहे. हा भत्ता मोटरमन, ट्रेन ड्रायव्हर्स, ट्रेन ऑपरेशन्स कर्मचारी आणि देखभाल कर्मचार्‍यांना दिले जातील.

ज्या रेल्वे कर्मचाऱ्यांना 43600 रुपए पेक्षा अधिक वेतन आहे. त्यांना सध्यास्थितीत या निर्णयाचा फारसा फायदा पाहायला मिळत नव्हता. हा भत्ता सुरुवातीला सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळत होता. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने या भत्त्याची एक सीमा निश्चीत केली होती. 43600 से अधिक रुपये घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाईट अलाऊन्स बंद करण्याचा आदेश दिला होता. (हेही वाचा, 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 34 टक्के महागाई भत्त्यास मंजूरी)

रेल्वे मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाकडे पाठीमागील वर्षी 23 नोव्हेंबरला सहमतीसाठी बोर्डाच्या वतीने या संदर्भात एक पत्र लिहीले होते. रेल्वे बोर्डाच्या सचिवांनी हे म्हटले होते की, व्यय विभागाने 16 डिसेंबर 2021 ला कार्यालयीन माहिती प्रति कार्मिक एवं प्रशिक्षण विभागाला पाठविली आहे. इतकेच नव्हे तर या मुद्द्यावर डीओपीटीला एक संदर्भही दिला आहे. दरम्यान, बोर्डी ओपीटीकडून उत्ताची वाट पाहात आहे. त्यानंतरत पुढील प्रक्रिया सुरु होणार आहे.