Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच एक चांगली बातमी मिळू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महागाई भत्त्यात (DA) वाढीची घोषणा मार्चच्या अखेरीस केली जाऊ शकते, जर CPIIW चा आकडा डिसेंबर 2021 पर्यंत 125 असेल, तर महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि होळीपूर्वी 10 मार्च रोजी महागाई वाढीची घोषणा केली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या एकूण महागाई भत्ता (DA) 31 टक्के आहे. जो 34 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. महागाई भत्ता 34 टक्के केला तर पगारात 20 हजार रुपयांची वाढ होऊ शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार डीए 3 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा करू शकते. 3 टक्के वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 20,000 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. 7व्या केंद्रीय वेतन आयोगाअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए मूळ वेतनाच्या आधारे मोजला जातो. ऑक्टोबरमध्ये 3 टक्के आणि जुलैमध्ये 11 टक्क्यांच्या वाढीनंतर सध्याचा डीए दर 31 टक्के आहे. ( वाचा - 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्‍यांच्या DA मध्ये 14 टक्क्यांच्या वाढीची घोषणा; 18 महिन्यांची थकबाकी एकरकमी मिळणार का? जाणून घ्या सविस्तर)

जर कर्मचाऱ्याचा मूळ पगार 56900 रुपये असेल तर तुम्हाला इतका DA मिळेल

नवीन DA (34%) रुपये 19,346 प्रति महिना.

आजपर्यंत डीए (31%), रु. 17639 प्रति महिना.

किती महागाई भत्ता वाढला, 19346 17639 = 1,707 रुपये प्रति महिना.

पगारवाढ 1,707 x 12 = रु. 20,484 प्रतिवर्ष.

वार्षिक DA – 19346 X 12 = रु 2,32,152.

मार्चअखेर महागाई भत्त्यात (डीए) वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते. जानेवारी 2022 मध्ये कर्मचार्‍यांचा एकूण DA 31% वरून 34% ने घेऊन DA मध्ये 3% ने वाढ करण्यात आली. AICPI डेटानुसार, DA डिसेंबर 2021 पर्यंत 34.04% वर पोहोचला आहे. भत्त्यांमध्ये 3% वाढ झाल्यानंतर 18,000 रुपयांच्या मूळ वेतनावरील डीए वार्षिक 73,440 रुपये होईल.