Himachal Pradesh Landslide | @airnewsalerts

Himachal Pradesh Flood: गेल्या आठवड्यापासून हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये आतापर्यंत 78 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. तथापी, अनेकजण बेपत्ता झाले आहेत. 20 जूनपासून राज्यात अचानक पूर, भूस्खलन (Landslide) आणि ढगफुटीने थुनागमधील घरे, पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. तथापी, शेजारच्या उत्तराखंडमध्ये उच्च सतर्कता कायम असून चार जिल्ह्यांमध्ये संभाव्य भूस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस -

प्राप्त माहितीनुसार, 6 जुलैपर्यंत, हिमाचल प्रदेशात अचानक पूर, 19 ढगफुटी आणि 16 भूस्खलन झाल्याची नोंद झाली आहे. 78 मृत्यूंपैकी 50 जण बुडणे, वीज पडणे, वीज कोसळणे आणि अचानक पूर यासारख्या पावसाशी संबंधित घटनांमुळे झाले आहेत. याव्यतिरिक्त, रस्ते अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (SDMA) किमान 37 लोक अजूनही बेपत्ता असल्याची पुष्टी केली आहे. (हेही वाचा -Landslides In Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे मोठे नुकसान; मंडी जिल्ह्यात 13 जणांचा मृत्यू)

मंडीत मोठ्या प्रमाणात नुकसान -

मुसळधार पावसामुळे मंडीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिमाचल सहकारी बँकेचा पहिला मजला पाण्यात आणि ढिगाऱ्यात बुडाला आहे. वृत्तानुसार, स्थानिकांनी सांगितले की त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान वस्तू आणि कागदपत्रे नष्ट झाली आहेत. पुरात वाहून गेलेल्या वस्तू लुटण्याचा प्रयत्न लोक करत असल्याने या भागात चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

घरांचे आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान -

दरम्यान, पुरामुळे पायाभूत सुविधांनाही मोठा फटका बसला आहे. 243 रस्ते बंद करण्यात आले असून अनेक ठिकाणी वीज ट्रान्सफॉर्मर बंद करण्यात आले आहेत. तथापी, 261 पाणीपुरवठा प्रकल्प ठप्प आहेत. भारतीय हवामान खात्याने पुढील तीन दिवसांत मुसळधार पाऊस आणि वादळांचा अंदाज वर्तवला आहे.