धक्कादायक! गेली 19 वर्षे ही महिला राहत आहे सार्वजनिक शौचालयात; अजूनही आशा आहे मुलीच्या येण्याची
19 वर्षे महिला राहत आहे शौचालयात (Photo Credit : Twitter)

गरिबी माणसाला काहीही करायला भाग पाडते. जेव्हा एक वेळच्याही जेवणाची भ्रांत असते त्यावेळी माणूस कोणत्याही थराला जाण्याची शक्यता असते. याच गोष्टीशी निगडीत एक हृदयद्रावक घटना समोर येत आहे. गरिबीमुळे एका 65 वर्षीय वृद्ध महिलेला चक्क शौचालयात (Public Toilet) राहावे लागत आहेत. एक नाही, दोन नाही तर गेली 19 वर्षे ही महिला या शौचालयात राहत आहे. या महिलेचे नाव करुपायी (Karuppayi) असून ती तामिळनाडू राज्यातील मदुराई (Madurai) जिल्ह्यातील रहिवासी आहे.

एएनआय ट्विट -

या महिलेला पेन्शन लागू झाली होती, मात्र कैक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयाची पायरी चढूनही काही फायदा झाला नाही. शेवटी करुपायी यांना सार्वजनिक शौचालयातच आपला बाडबिस्तरा मांडावा लागला. अशाप्रकारे गेली 19 वर्षे त्या त्या शौचालयात राहत आहेत. या ठिकाणीच त्यांनी आपला संसार थाटला आहे. याच शौचालयातील एका कोपऱ्यात त्यांची चार भाडी आहेत व तिथेच त्या स्वयंपाक करतात. (हेही वाचा: जगप्रसिद्ध पॉर्न स्टार Jenni Lee भुयारात जगतेय, 'या' अवस्थेत भेटली)

या शौचालयांची स्वच्छता करून तसेच तिचा वापर करण्यासाठी येणाऱ्या लोकाकांकडून काही पैसे घेऊन त्या स्वतःचा चरितार्थ चालवत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांचे काही फोटोही प्रसिद्ध केले आहेत. आपल्याकडे कमाईचा इतर कोणताही मार्ग नसल्याने आपण हा उपाय योजला असे त्या सांगतात. अशाप्रकारे दिवसाला त्या फक्त 70-80 रुपयांचीच कमी करू शकतात. यांना एक मुलगीही आहे, मात्र ही मुलगी आपण अशा अवस्थेत असूनही आपल्याला भेटायला आली नाही असेही त्या म्हणल्या.