Lift Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Boy Trapped In Elevator Shaft At Hyderabad: हैदराबाद (Hyderabad) मध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. हैदराबादमध्ये शुक्रवारी एका अपार्टमेंटच्या लिफ्टच्या दारात (Elevator Shaft) आणि भिंतीमध्ये एक मूल अडकले होते. परंतु, या मुलाला वाचवण्यात आले होते. बचावाच्या वेळी मूल जिवंत होते. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु अडकल्यामुळे जखमी झालेल्या सहा वर्षांच्या मुलाचा शनिवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी मसाब टँक परिसरात पीडित मुलगा लिफ्टच्या शाफ्टमध्ये अडकला होता. यानंतर, तो पहिल्या मजल्याजवळ दोन तासांहून अधिक काळ अडकून राहिला. हैदराबाद आपत्ती प्रतिसाद आणि मालमत्ता संरक्षण एजन्सी आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गॅस कटरचा वापर करून लिफ्टची फ्रेम आणि फरशीचा स्लॅब कापला आणि मुलाला वाचवले. (हेही वाचा - Lucknow Hospital: डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, पीडित कुटुंबाला सुरक्षा रक्षकांकडून बेदम मारहाण; लखनऊमधील घटना (Watch Video))

यानंतर जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अंतर्गत दुखापतींमुळे शनिवारी दुपारी 12.30 वाजता मुलाला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी सांगितले की, दोन तासांपेक्षा जास्त काळ अडकल्यानंतर मुलाला गुदमरल्यासारखे झाले. या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (हेही वाचा - Murder in MahaKumbh 2025: महाकुंभमध्ये हत्येची घटना; पतीने केला पत्नीचा खून, गुन्हा लपवण्यासाठी कुंभमध्ये हरवल्याची बतावणी, नेमकं घडलं काय?)

तथापी, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगा त्याच्या आजोबांसोबत अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये एका नातेवाईकाला भेटण्यासाठी गेला होता. तो तळमजल्यावर असलेल्या लिफ्टमध्ये घुसला. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, दरवाजा पूर्णपणे बंद होण्यापूर्वीच लिफ्ट वर जाऊ लागली आणि मुलगा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना तो लिफ्ट आणि भिंतीमध्ये अडकला.