विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सी प्रायव्हेट लिमिटेडला करमणूक कर माफी देण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने आज घेतला. हा कार्यक्रम 1996 मध्ये झाला होता.

कुडलूर, विल्लुपुरम, कल्लाकुरुची, थेनी, दिंडुगल, कोयंबटूर, विरुधुनगर आणि रामनाथपुरममध्ये ढगाळ वातावरण असल्याची छायाचित्रे उपग्रहाद्वारे प्राप्त झाली आहेत. पुढचे तीन ते चार दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच, चेन्नईमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताः चेन्नई हवामान विभागाने वर्तवली आहे.

कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यातील रेडीओ केंद्राजवळ आज विज कोसळली. त्यामुळे परिसरातील हॉटेलला भीषण आग लागली आहे.

राजकीय आखाड्यात एकमेकांना डाव दाखवण्याच्या खटाटोपात आपण काय करतो आहोत याचे भानच काहींना राहात नाही. आशाच काहीशा प्रकारातून ग्रामपंचायत निवडणुकीत चक्क 75 वर्षीय उमेदवाराचे अपरहण घडल्याचा प्रकार घडला आहे. इतकेच नव्हे तर संबंधित उमेदवाराला दबाव टाकून उमेदवारी अर्ज माघेही घ्यायला लावल्याचे पुढे आल आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील पेठ ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान घडली. या प्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

राज्यातील महाविकासआघाडी सरकारने बांधकाम व्यवसायिकांना प्रीमियम मध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केल आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (6 जानेवारी 2021) पार पडली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. 2021 या नववर्षातील ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक होती.

राज्यातील शहरांच्या नामांतराच्या वादावर काँग्रेस पक्षाने ठाम भूमिका घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. थोरात यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.

सीमावर्ती बेळगाव जिल्ह्यातील मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अधिस्वीकृती पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट दाखवूया. कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने न्यायालयाचा अवमान करून सीमाभागात एक-एक पाऊल टाकत आहे, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासन यापुढे पावले टाकेल. त्यासाठी सर्वपक्षीयांची, सर्व नेत्यांची एकजूट करूया असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई शहरात Night Curfew वाढवला जाणार नाही असे  मुंबई पोलिसांनी जाहीर केले आहे.

हिमाचल प्रदेशातील सोलन येथे जवळजवळ 500 मृत कोंबड्या आढळल्या आहेत.

गुजरात येथे कोरोनाचे आणखी 665 रुग्ण आढळले असून आणखी 4 जणांचा बळी गेला आहे.

Load More

आज 6 जानेवारी. म्हणजेच मराठी पत्रकारीता दिन. मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त पत्रकार दिन साजरा केला जातो. काळानुसार पत्रकारीतेचे स्वरुप बदलले. पेन-पेपर वरील पत्रकारीता नंतर टीव्ही, रेडीओ च्या माध्यमातून लोकांसमोर आली. त्यानंतर आता पत्रकारीतेचे डिजिटल स्वरुप सर्व अनुभवत आहेत.

गेल्या अनेक महिन्यांपासून गडद असलेले कोरोना व्हायरस संसर्गाचे सावट आता धुसर होऊ लागले आहे. त्यातच लसीकरणालाही सुरुवात होणार असल्याची सकारात्मक बातमी आहे. त्यामुळे सर्वत्र आशादायी वातावरण निर्माण झाले आहे. मात्र कोविड-19 संसर्गाचा धोका अद्याप पूर्णत: टळलेला नाही. त्यामुळे सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान, देशासह राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे येथे ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले. तर कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, सातारा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. 6 आणि 7 जानेवारी रोजी देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.