एअर इंडियाचे यूएसए आणि यूकेसह विविध देशांमध्ये सुमारे 300 विमानांसाठी बुकिंग सुरू; 5 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Poonam Poyrekar
|
Jun 05, 2020 10:48 PM IST
निसर्ग चक्रीवादळामुळे (Nisarga Cyclone) रायगड जिल्ह्यात नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. चक्रीवादळामुळे अनेकांची घरे कोलमडून गेली तर अनेकांचे संसार उघडल्यावर पडले. आज पावसाचा जोर कमी झाल्यामुळे येथील परिसराचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे आज रायगड जिल्ह्याचा पाहणी दौरा करणार आहेत. आज सकाळी 11.30 मिनिटांनी गोल्डन गेट ने रो-रो बोटीतून मांडला जेटीकडे प्रस्थान करतील. अलिबागमध्ये निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. तसेच येथील नुकसानग्रस्त नागरिकांसी देखील बातचीत करतील.
निसर्ग चक्रीवादळाचा धोका जरी शमला असला तरीही कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट महाराष्ट्रावर अजूनही घोंगावत आहे. काल दिवसभरात महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाग्रस्तांची संख्या 77,793 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात 2710 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने (State Health Department) माहिती दिली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर भारतात 2,16,919 एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली आहे. देशात आतापर्यंत 6075 कोरोना रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.