Representational Image | (Photo Credits: File Photo)

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) बलात्काराचे सत्र संपायचे नाव घेत नाही. हाथरस सामुहिक बलात्कार (Hathras Gangrape) प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हाथरस (Hathras) येथील सासनी (Sasni) परिसरात एका 4 वर्षांच्या मुलीवर नातेवाईकाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. सर्कल अधिकारी (Circle Officer) रुची गुप्ता (Ruchi Gupta) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. (बलात्काराच्या घटनांमध्ये भारतातील 'हे' 10 राज्य आहेत अतिशय घातक; राजस्थानमध्ये सर्वाधिक भयानक परिस्थिती, तर महाराष्ट्रात 55 टक्क्यांनी वाढलेत बलात्कार प्रकरणं)

उत्तर प्रदेशातील हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. ही घटना ताजी असतानाच देशाच्या विविध भागांतून बलात्काराच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बालिका, महिला यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Bihar Gangrape: धक्कादायक! बॅंकेत जात असताना एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार; बिहारमधील बक्सर येथील घटना)

ANI UP Tweet:

काय आहे हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरण?

हाथरस येथे 14 सप्टेंबर रोजी गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या 19 वर्षीय मुलीवर 4 जणांनी बलात्कार करुन तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. यात पीडित मुलगी जबर जखमी झाली. तिच्यावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र 29 सप्टेंबर रोजी तिची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. त्यानंतर तिच्यावर युपी पोलिसांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्यावेळेस पीडितेच्या कुटुंबियांना घरात कोंडून ठेवल्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे.