Live
निसर्ग या चक्रीवादळामुळे पालघर, पुणे आणि रायगडसह 14-15 जिल्ह्यात नुकसान; 4 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Jun 04, 2020 11:34 PM IST
निसर्ग चक्रीवादळाचे मुंबईवरील संकट टळले. दरम्यान रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. त्या भागात एनडीआरएफच्या पथकाकडून पुनर्वसनाचे काम सुरु झाले. दरम्यान निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आभार मानले आहेत.
निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळल्यानंतर आज मुंबईकरांनी मॉर्निंग वॉकसाठी बाहेरची वाट धरली. दरम्यान देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचे संकट कायम आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 2 लाखांच्या पार केला असून 5 हजार हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु, या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन विविध पातळ्यांवर तयारी करत आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान जॉर्ज फ्लॉयड नामक कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान अमेरिकेतील महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली. गांधीजींचा हा पुतळा वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासाबाहेर आहे.